Bounce Infinity E1 Term, Condition: बॅटरी स्वॅपिंगवाली बाऊन्स इन्फिनीटी बुक केलीय का? स्वस्त आहे पण... जाणून घ्या अटी...
By हेमंत बावकर | Published: February 25, 2022 06:45 PM2022-02-25T18:45:10+5:302022-02-25T18:46:55+5:30
Bounce Infinity E1 battery swapping or buy with battery: केंद्र सरकारने देखील अर्थसंकल्पात मोठ्या शहरांमध्ये बॅटरी स्वॅपिंग सेंटरना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. तासंतास चार्जिंग स्टेशनवर थांबण्यापेक्षा हा पर्याय फक्त दो मिनिटांत तुमचे वाहन चार्ज करणारा आहे. यामुळे मोठी अडचण दूर होणार आहे.
- हेमंत बावकर
एकीकडे लोकांना ईलेक्ट्रीक स्कूटर किंवा कार चार्ज कुठे आणि कशी करायची असा प्रश्न पडलेला असताना एका कंपनीने बॅटरी स्वॅपिंगची संकल्पना आणली आणि त्यावर लोकांनी उड्याही टाकल्या. आता या कंपनीचे मेसेज लोकांना येऊ लागले आहेत. यानुसार तुम्ही कोणत्या भागात राहता याचे लोकेशन कंपनीने मागितले आहे. त्या ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग सेंटर उघडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.
केंद्र सरकारने देखील अर्थसंकल्पात मोठ्या शहरांमध्ये बॅटरी स्वॅपिंग सेंटरना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. तासंतास चार्जिंग स्टेशनवर थांबण्यापेक्षा हा पर्याय फक्त दो मिनिटांत तुमचे वाहन चार्ज करणारा आहे. यामुळे मोठी अडचण दूर होणार आहे. या संकल्पनेचा बाऊन्सला फायदा होणार आहे.
परंतू यासाठी बाऊन्सने मासिक भाडे ठरविलेले आहे. यानुसार तुम्हाला प्लॅन निवडावा लागेल. तो तुमच्या रनिंगनुसार असेत ८०० रुपये आणि १२०० रुपये तुम्हाला महिन्याला द्यावे लागणार आहेत. बाऊन्स इन्फिनिटी स्कूटरची किंमत जरी कमी असली तरी वर्षाला ही रक्कम ९६०० ते १४ हजारावर जाणार आहे. तसेच प्रत्येक स्वॅपिंगला ३५ रुपयांचा चार्जही आकारला जाणार आहे.
बाऊन्सने दोन पर्याय ठेवले आहेत. एकतर बॅटरीसकट स्कूटर खरेदी करायची किंवा बॅटरी शिवाय. बॅटरीसकट स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला चार्जर देखील मिळेल. परंतू याची किंमत ५० ते ६० हजारात असेल. तर बॅटरीशिवाय स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला ही स्कूटर ३५ हजारांत मिळेल. ही महाराष्ट्रातील किंमत आहे. ज्यांनी बॅटरीसह स्कूटर घेतली असेल त्यांना स्वॅपिंग सेंटरवर ती स्वॅप करता येणार नाही. तर ज्यांनी विना बॅटरी स्कूटर घेतलीय त्यांना चार्ज करता येणार नाही.
कंपनीने प्रत्येक १ किमीवर बॅटरी स्वॅपिंग सेंटर उघडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. बंगळुरुमध्ये कंपनीने स्कूटरची टेस्ट ड्राईव्हही सुरु केली आहे. मार्चपासून स्कूटरची डिलिव्हरी केली जाईल. चार्जिंग संपत आले की कंपनी तुम्हाला जवळचे स्वॅपिंग सेंटर कुठे आहे हे सांगणार आहे. कंपनी यासाठी ग्राहकांची लोकेशन मागवत आहे. यामध्ये या ग्राहकांना स्वॅपिंग सेंटर सुरु करण्यासाठी देखील ऑफर दिली जात आहे. यात १० टक्के फायदा देण्यात येणार आहे.
बॅटरीसह विकत घेणाऱ्यांना तोटा कोणता...
बाऊन्स बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देतेय. जर विकत घेतली आणि तीन वर्षानंतर खराब झाली तर तुम्हाला ४० ते ४५ हजारांचा फटका बसणार आहे. बाऊन्सचा बॅटरी स्वॅपिंग प्लॅन पाहता तो तीन वर्षांनी 1200 रुपयाचा प्लॅनही 14,400 रुपये वर्षाप्रमाणे 43,200 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर ८०० रुपयांच्या प्लॅनला तीन वर्षाला 28,800 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चौथ्या वर्षाला तुम्हाला स्कूटरसाठी वाढीव मोजलेली २५ तीस हजाराची रक्कम वसूल करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. या सर्वाचा हिशेब घालून तुम्हाला बॅटरी स्वॅपिंगची स्कूटर घ्यायची की बॅटरी असलेली स्कूटर घ्यायची याचा विचार करावा लागणार आहे.