Boycot Hyundai Trending: पाकिस्तानातून एक ट्विट, अन् भारतात #BoycotHyundai ट्रेंड होऊ लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:39 PM2022-02-06T23:39:13+5:302022-02-06T23:39:55+5:30
Boycot Hyundai Trending: सोशल मीडियावर भूकंप आला. ह्युंदाईला लोक शिव्या देऊ लागले. ह्युंदाईने जगातील सर्वात मोठ्या बाजाराला समजण्यास चुकी केली, आता भारतीय कंपनीला गुढघ्यावर आणतील. काही भारतीयांनी तर ह्युंदाईच्या कार खरेदी न करण्याचेही म्हटले.
भारतात गेल्या दोन दशकांपासून दुसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनलेली ह्युंदाई आज भारतात जबरदस्त ट्रोल झाली. पाकिस्तानातून एक ट्विट करण्यात आले होते. यामध्ये ह्युंदाई कास्मीरबाबत पाकिस्तानचे समर्थन करत असल्याचे म्हटले होते. हे ट्विट Hyndai Pakistan च्या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आले होते.
काश्मीरी बंधू आणि त्यांच्या बलिदानाचे समर्थन करुया, कारण ते स्वातंत्र्यासाठी लढत राहिले, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. याचसोबत #HyundaiPakistanआणि #KashmirSolidarityDay हा हॅशटॅग देण्यात आला.
यामुळे सोशल मीडियावर भूकंप आला. ह्युंदाईला लोक शिव्या देऊ लागले. ह्युंदाईने जगातील सर्वात मोठ्या बाजाराला समजण्यास चुकी केली, आता भारतीय कंपनीला गुढघ्यावर आणतील. काही भारतीयांनी तर ह्युंदाईच्या कार खरेदी न करण्याचेही म्हटले. ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. मात्र, त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले आहेत.
यामुळे ह्युंदाईने भारतात एक स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनीने म्हटले- 'ह्युंदाई मोटर इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही राष्ट्रवादाच्या संदर्भात ठामपणे उभे आहोत. एका अवांछित सोशल मीडिया पोस्टमध्ये दाखवलेल्या Hyundai Motor India च्या लिंकमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारत हे Hyundai ब्रँडचे दुसरे घर आहे आणि असंवेदनशील संवादाबाबत आमचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि आम्ही अशा कोणत्याही विचारांचा तीव्र निषेध करतो. भारताप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही देशाच्या तसेच नागरिकांच्या भल्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू.
@Hyundai_Global@HyundaiIndia
— Major Ashutosh Garg Veteran (@majorashutosh) February 6, 2022
You want to do business while going against our Nation.
Get your tweets deleted and seek unconditional apology from all Indians.
If you will not do it, we will ensure not to buy any Hyundai Vehicle future.#BoycottHyundai#Hyundaipic.twitter.com/332ophEW6l
आता पाकिस्तानातून पोस्ट झालेले ट्विट हे ह्युंदाईच्या अधिकृत हँडलवरून होते की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ह्युंदाईने जे काही म्हटलेय ते देखील लोकांना रुचलेले नाही. लोकांनी ह्युंदाईला सपशेल माफी मागण्याची मागणी केली होती. परंतू ह्युंदाईने माफी न मागितल्याने भारतीय नेटकरी संतापलेले आहेत.