१ लाख रुपये भरून घरी आणा नवीन Maruti WagonR; महिन्याला किती EMI भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:12 AM2022-10-20T11:12:53+5:302022-10-20T11:13:36+5:30

तुम्ही WagonR हॅचबॅक फक्त रु. १ लाख डाऊन पेमेंटसह घरी नेऊ शकता.

Bring home a new Maruti WagonR for Rs 1 lakh; How much EMI to pay per month? | १ लाख रुपये भरून घरी आणा नवीन Maruti WagonR; महिन्याला किती EMI भरावा लागेल?

१ लाख रुपये भरून घरी आणा नवीन Maruti WagonR; महिन्याला किती EMI भरावा लागेल?

googlenewsNext

नवी दिल्ली - सध्या सणासुदीचे दिवस असल्याने अनेकजण नवीन खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात काहींनी नवी कोरी कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग केले असेल तर त्यांच्यासाठी वॅगनआर हा उत्तम पर्याय आहे. मारुती सुझुकी वॅगनआर झेडएक्सआय प्लस ऑटोमॅटिक (Maruti WagonR ZXI Plus AT) ७.०८ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रकारांपैकी एक आहे. 

या व्हेरिएंटचे मायलेज 24.43 kmpl पर्यंत आहे. त्याच वेळी, WagonR ZXI Automatic (Maruti WagonR ZXI AT) ची एक्स-शोरूम किंमत ६.६० लाख रुपये आहे. WagonR च्या या दोन्ही वाहनांना अर्थसहाय्य करणे खूप सोपे आहे. तुम्ही WagonR हॅचबॅक फक्त रु. १ लाख डाऊन पेमेंटसह घरी नेऊ शकता. यानंतर, तुम्हाला किती कर्ज मिळेल आणि किती दिवसांसाठी कोणत्या व्याजदरावर, किती EMI असेल याचे सर्व तपशील जाणून घेऊया.

Maruti Suzuki WagonR ZXI AT व्हेरियंटची ऑन-रोड किंमत ७,४७,५४९ रुपये आहे. जर तुम्ही WagonR ZXI ऑटोमॅटिक व्हेरियंटला १ लाख डाउन पेमेंट (रोड चार्जेस आणि प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याच्या हप्त्यावर) फायनान्स करत असाल आणि व्याज दर ९% असेल, EMI कॅल्क्युलेटर नुसार तुम्हाला ६,४७,५४९ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल यानंतर, तुम्हाला ५ वर्षांसाठी दरमहा १३४४२ रुपये EMI म्हणजेच मासिक हप्ता भरावा लागेल. मारुती WagonR ZXI ऑटोमॅटिकवर अर्थसहाय्य घेतल्यावर, तुम्हाला ५ वर्षांमध्ये सुमारे रु.१.६० लाख व्याज लागेल.

Maruti Suzuki WagonR ZXI Plus AT ची ऑन-रोड किंमत ८,०१,२११ लाख रुपये आहे. जर तुम्ही मारुती WagonR ZXI Plus ऑटोमॅटिक व्हेरियंटला १ लाख (रोड चार्जेस आणि प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा EMI) डाउन पेमेंट करून अर्थसहाय्य घेतले तर तुम्हाला ७,०१,२११ रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर ९ टक्के असेल, तर कार देखो EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १४,५५६ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. Maruti WagonR ZXI Plus ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी कर्ज घेतल्यावर तुम्हाला ५ वर्षांमध्ये सुमारे रु. १.७३ लाख व्याज लागेल.
 

Web Title: Bring home a new Maruti WagonR for Rs 1 lakh; How much EMI to pay per month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.