BS6 : सात सीटर Renault Triber, Kwid लाँच; किंमतीही वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:37 PM2020-01-29T14:37:50+5:302020-01-29T14:37:55+5:30
Renault Triber, Kwid Launch : दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत.
रेनॉल्टने भारतीय बाजारात BS6 मानांकनामध्ये दोन लोकप्रिय कार लाँच केल्या आहेत. यामध्ये स्वस्तातली सात सीटर एमपीव्ही Renault Triber आणि मारुतीच्या अल्टोला टक्कर देणारी मिनी एसयुव्ही Kwid चा समावेश आहे. या कार अपडेट केल्याने किंमतीही वाढल्या आहेत.
दोन्ही कार काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत. परंतू नवीन इंजिन आल्याने किंमती वाढल्या आहेत. क्वीडची किंमत 9 हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे.
बीएस ६ इंजिनची ट्रायबर या कारची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. कंपनीने ट्रायबरच्या किंमतीमध्ये चार ते 29 हजार रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कंपनीने किंमत वाढविली होती. तर लवकरच एएमटी व्हेरिअंटही लाँच केले जाणार आहे. यासोबत 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनची कारही लाँच केली जाणार आहे.
Triber RXE: 4.99 लाख रुपये
Triber RXS: 5.74 लाख रुपये
Triber RXT: 6.24 लाख रुपये
Triber RXZ: 6.78 लाख रुपये
तर क्वीड ही कार दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिन देण्यात आली आहेत. या बीएस 6 च्या इंजिनला बीएस 4 चीच ताकद असणार आहे. 1.0 मध्ये अॅटो गिअरबॉक्स मिळेल. तर 0.8 मध्ये केवळ मॅन्युअल गिअरबॉक्स मिळणार आहे.
STD 2.92 लाख 2.83 लाख 9000
RxE 0.8 3.62 लाख 3.53 लाख 9000
RxL 0.8 3.92 लाख 3.83 लाख 9000
RxT 0.8 4.22 लाख 4.13 लाख 9000
RxT 1.0 4.42 लाख 4.33 लाख 9000
RxT (O) 1.0 4.50 लाख 4.41 लाख 9000
RxT AT 1.0 4.72 लाख 4.63 लाख 9000
RxT (O) AT 1.0 4.79 लाख 4.70 लाख 9000
Climber 4.63 लाख 4.54 लाख 9000
Climber (O) 4.71 लाख 4.62 लाख 9000
Climber AT 4.93 लाख 4.84 लाख 9000
Climber (O) AT 5.01 लाख 4.92 लाख 9000