जगातली सर्वात वेगवान कार खरेदी करण्यासाठी लोक देताहेत ४५ कोटींचा टॅक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:26 PM2019-03-11T13:26:35+5:302019-03-11T13:33:54+5:30

ऑटो इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कंपनी बुगाटीने जगातली सर्वात वेगवान कार Bugatti La Voiture Noire आणली आहे.

Bugatti la voiture noire worlds most fast and expensive car sold in 133 crore rupees | जगातली सर्वात वेगवान कार खरेदी करण्यासाठी लोक देताहेत ४५ कोटींचा टॅक्स!

जगातली सर्वात वेगवान कार खरेदी करण्यासाठी लोक देताहेत ४५ कोटींचा टॅक्स!

googlenewsNext

(Image Credit : NBT)

ऑटो इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कंपनी बुगाटीने जगातली सर्वात वेगवान कार Bugatti La Voiture Noire आणली आहे. ही कार जगातली सर्वात महागडी कार असल्याचं सांगितलं जात आहे. या कारची किंमत १३३ कोटी रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. लक्झरी कारची आवड असणारे लोक ही कार खरेदी करत आहेत. ही कार जिनेव्हा २०१९ मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या मोटार शोमध्ये कारवरून पडदा उठायच्या आधीच एका व्यक्तीने ही कार खरेदी केली. रिपोर्टनुसार, मुळात या कारची किंमत ८७.६ कोटी रूपये इतकी आहे. पण ऑन रोड या कारची किंमत १३३ कोटी रूपये होते. 

रिपोर्टनुसार, या कारमध्ये ४५ कोटी रूपयांचा टॅक्स जोडला जातो. त्यानंतर कारची खरी ८७.९ कोटी रूपये ही किंमत १३३ कोटी रूपये इतकी होते. 

La Voiture Noire हा एक फ्रेन्च शब्द असून याचा अर्थ द ब्लॅक कार असा होतो. या सुपरफास्ट कारचं डिझाइन १९३० मध्ये आलेल्या 57SC Atlantic या कारवरून प्रेरित आहे. ही कार बुगाटीचे फाऊंडर Ettore Bugatti यांचा मुलगा Jean Bugatti ने डिझाइन केली होती. 

जगातली सर्वात महागडी कार Bugatti La Voiture Noire केवळ २.४ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. या कारचा टॉप स्पीड ४२० किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीने दावा केला आहे की, शहरी परीसरात या कारला १०० किमीचं अंतर पार करण्यासाठी ३५.२ लिटर पेट्रोलची गजर पडेल.

Web Title: Bugatti la voiture noire worlds most fast and expensive car sold in 133 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.