Royal Enfield Bullet 350 : फक्त 9 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता नवीन बुलेट, जाणून घ्या कंपनीची 'ही' शानदार स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 01:12 PM2022-08-21T13:12:13+5:302022-08-21T13:12:58+5:30

Royal Enfield Bullet 350 : कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक फायनान्स स्कीम (Royal Enfield Finance Scheme) आणली आहे, ज्यानुसार कंपनीच्या विविध मॉडेल्सवर डाउन पेमेंट आणि ईएमआयची सुविधा दिली जात आहे.

bullet 350 finance emi bullet 350 available just nine thousand rupees of down payment | Royal Enfield Bullet 350 : फक्त 9 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता नवीन बुलेट, जाणून घ्या कंपनीची 'ही' शानदार स्कीम

Royal Enfield Bullet 350 : फक्त 9 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता नवीन बुलेट, जाणून घ्या कंपनीची 'ही' शानदार स्कीम

googlenewsNext

नवी दिल्ली : टू-व्हीलर निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आपल्या दमदार बाईक्ससाठी प्रसिद्ध आहे. कंपनी देशात सर्वाधिक 350cc बाईक विकते. रेट्रो डिझाईनमुळे आणि उत्तम लुकमुळे कंपनीच्या बाईक्स लाखो लोकांची पहिली पसंती आहे. रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची मोठ्या प्रमाणात विक्रीही होते. 

किमतीच्या बाबतीत, या बाईक्स इतर बाईक्सच्या तुलनेत थोड्या महाग असतात. यामुळे अनेकांना इच्छा असूनही खरेदी करता येत नाही. अशा लोकांसाठी रॉयल एनफिल्डने एक जबरदस्त ऑफर आणली आहे, ज्यामुळे आता तुम्ही फक्त 9 हजार रुपये देऊन नवीन बुलेट घरी आणू शकता.

दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक फायनान्स स्कीम (Royal Enfield Finance Scheme) आणली आहे, ज्यानुसार कंपनीच्या विविध मॉडेल्सवर डाउन पेमेंट आणि ईएमआयची सुविधा दिली जात आहे. यामध्ये रॉयल एनफील्ड बुलेट 350 वर (Royal Enfield Bullet 350) सर्वात कमी डाउन पेमेंट करता येते, जे फक्त 9000 रुपयांचे डाउन पेमेंट करून खरेदी केली जाऊ शकते.

आपल्या माहितीसाठी, बुलेट 350 च्या किक स्टार्ट व्हर्जनची दिल्लीत ऑन रोड किंमत 1,71,017 रुपये आहे.  जर तुम्ही 9000 रुपये डाउन पेमेंट करून हे मॉडेल घेतले तर ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 9.7 टक्के व्याजदराने पुढील 3 वर्षांसाठी दरमहा सुमारे 5 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. यामुळे तुम्ही तुमची रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा छंद तुमच्या खिशावर टाकला तरीही पूर्ण करू शकता.

रॉयल एनफिल्डने अलीकडेच 350 सीसी सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड हंटर 350 ही नवीन बाईक लॉन्च केली आहे, जी दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत जवळपास 1.5 लाख रुपये आहे आणि टॉप वेरिएंटची किंमत जवळपास 1.6 आहे. हंटर 350 ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात हलकी बाइक आहे.

Web Title: bullet 350 finance emi bullet 350 available just nine thousand rupees of down payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.