होंडाकडून नवीन सीडी 110 ड्रीम लाँच; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:09 PM2020-06-02T22:09:59+5:302020-06-02T23:00:24+5:30
या व्यतिरिक्त अद्ययावत बाईक नवीन ग्राफिक्स, क्रोम एक्झॉस्ट शिल्ड, बॉडी कलर मिरर आणि सिल्व्हर फिनिश अलॉय व्हील्ससह आली आहे.
नवी दिल्लीः होंडाने आपल्या सर्वात स्वस्त बाईक होंडा सीडी 110 ड्रीमचे बीएस 6 मॉडेल लॉन्च केले आहे. होंडा सीडी 110 ड्रीम बीएस 6 दोन प्रकारांमध्ये (स्टँडर्ड आणि डिलक्स) बाजारात उपलब्ध करून दिली आहे. बीएस 6 इंजिनाव्यतिरिक्त बाईकमध्ये बरेच अपडेट केले गेले आहेत. या बाईकला खास नवे लूक देण्यात आले आहे. होंडाने या बीएस 6 बाईकचे स्टायलिंग अपडेट केले असून, त्याच्या बॉडीवर्कमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अद्ययावत बाईक नवीन ग्राफिक्स, क्रोम एक्झॉस्ट शिल्ड, बॉडी कलर मिरर आणि सिल्व्हर फिनिश अलॉय व्हील्ससह आली आहे.
होंडा सीडी 110 ड्रीममधील सर्वात मोठा बदल त्याच्या इंजिनमध्ये झाला आहे. बाईकमध्ये आता बीएस 6 नियमावलीतील 109.51 सीसी, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवर 8.6एचपी आणि 5500 आरपीएम वर 9.30 एनएम टॉर्कची ऊर्जा उत्पन्न करते. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. होंडाच्या इतर बीएस 6 दुचाकी वाहनांप्रमाणेच सीडी 110 ड्रीममध्येही हे खास फीचर्स दिले आहेत. होंडाच्या सर्वात स्वस्त बाईकमध्ये इंजिन स्टार्ट / स्टॉप स्विच, डीसी हेडलॅम्प, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच, ट्युबलेस टायर्स, लांब आणि आरामदायक सीट, सीलेर आणि सील चेन असलेली सीबीएस अशी वैशिष्ट्ये आहेत. ही बाईक होंडाच्या एन्हेन्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
बीएस 6 कम्पिलिएट सीडी 110 ड्रीमच्या पुढील आणि मागील भागामध्ये 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत. एकूण 8 रंगांच्या पर्यायांमध्ये बाईक उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हेरिएंट बाईक ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ केबिन गोल्ड, ब्लॅक विथ रेड आणि ब्लॅक विथ ग्रेमध्ये उपलब्ध आहे. बाईकच्या डिलक्स व्हेरिएंटमध्ये ब्लॅक, अॅथलेटिक ब्लू मेटलिक, जिनी ग्रे मेटलिक आणि इम्पीरियल रेड मेटलिक कलरचे पर्याय आहेत. बीएस 6 होंडा सीडी 110 ड्रीम बाइक स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 64,505 आणि 65,505 रुपयांच्या आसपास आहे. या एक्स शोरूम दिल्लीच्या किमती आहेत.
हेही वाचा
लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल
Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ