बुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच! 'ती' येतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:24 PM2018-11-14T18:24:24+5:302018-11-14T18:26:36+5:30
बुलेटप्रेमींना उद्या एक मोठा धक्का बसणार आहे.
बुलेटप्रेमींना उद्या एक मोठा धक्का बसणार आहे. कारण काही दशकांपूर्वी मागच्या पिढीवर अधिराज्य गाजविलेली धाकड बाईक उद्या, गुरुवारी भारतात पुन्हा परतणार आहे. दोन सायलेन्सर आणि खतरनाक लूक असलेली ही बाईक पुन्हा भारतात धूम माजविणार असून थेट बुलेटला टक्कर देणार आहे.
Jawa Motorcycles ही कंपनी जावाची 300 सीसीची मोटारसायकल लाँच करणार आहे. या बाईकबाबतची अधिक माहिती उपलब्ध नसली तरीही कंपनीने जाहीर केलेला टीजर आणि व्हायरल झालेले फोटो खूप काही सांगून जात आहेत. नव्या हेडलाईटसह ड्युअल टोन कलर क्रोम फिनिशिंग देण्यात आली आहे. टाकीवरील ड्युअल कलर टोन आणि फ्लेअर्ड मडगार्ड बाईकची सुंदरता वाढवत आहेत.
While we await the epic homecoming of the Jawa on 15.11.18, here's something to set your heart racing. Have fun watching this legendary scene from the film 'Naa Ninna Mareyalare'. #jawamotorcycles#justjawa#jawaisback#jawawood#classicmovies#jawa#motorcyclespic.twitter.com/rLbXMPRKKS
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) November 11, 2018
Jawa Motorcycle ही रॉयल एन्फील्डला कडवी टक्कर देणार आहे. ही बाईक Royal Enfield च्या Continental GT 650 आणि Interceptor 650 शी स्पर्धा करेल.