Royal Enfield ची सर्वात स्वस्त मोटारसायकल येतेय? तुमच्या बजेटमध्ये बसले एकदम फिट; धमाल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:02 AM2022-02-14T11:02:50+5:302022-02-14T11:03:55+5:30
भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोटारसायकलचा सामना होंडा CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इम्पेरिअलसोबत होईल.
नवी दिल्ली - रॉयल एनफील्डने भारतातील मोटारसायकल सेगमेंटवर मजबूत पकड मिळवली आहे. रॉयल एनफील्डचा सामना करण्यासाठी बजाज आणि ट्रायम्फ एकत्रितपणे लवकरच काही नव्या आणि दमदार मोटारसायकली बाजारत आणणार आहेत. हे पाहता, रॉयल एनफील्डदेखील 2022 मध्ये बाजारावरील आपली पगड कायम ठेवण्याच्या दृष्टीने 4-5 नव्या बाईक्स बाजारात आणणार आहे. यांपैकी एक म्हणजे, हंटर 350. ही बाईक मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. या मोटारसायकलचे टेस्ट मॉडेल नुकतेच दृष्टीस पडले आहे. जे प्रोडक्शनच्या अगदी जवळ असल्याचे दिसत आहे.
मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित -
ही नवी मोटारसायकल मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी तिच्याच इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 शक्यतो जे-प्लॅटफॉर्मवरच तयार केली जात आहे. या सोबत 349 सीसीचे इंजिन असेल. हे इंजिन 22 बीएचपी एवढी शक्ती आणि 27 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
या इंजिनसोबतच कंपनी 5-स्पीड गियरबॉक्सदेखील देऊ शकते. तसेच, परीक्षणादरम्यानच्या व्हिडिओमध्ये, ही मोटारसायकल फारच सहजपणे 0-100 किमी/प्रति तास एवढा वेग घेत असल्याचे दिसते. असे मानले जात आहे, की मीटिओर 350 च्या तुलनेत या नव्या मोटारसायकलचा भार अत्यंत कमी असेल, मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची आधिकृत माहिती मिळालेली नाही.
हंटर 350 ही या सेगमेंटमधील सर्वात जास्त परवडणारी मोटारसायकल? -
आपण 2021 च्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि हिमालयन मॉडेल्समध्ये पाहिल्या प्रमाणेच, हंटर 350 देखील सेमी-डिजिटल कन्सोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीमसह येईल. हंटर 350 ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी मोटारसायकल म्हणून समोर येऊ शकते. यामुळे बाईकसोबत अधिक चांगले दिसणारे एलईडी, डीआरएल आणि ब्लिंकर्स नसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोटारसायकलचा सामना होंडा CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इम्पेरिअलसोबत होईल. भारतात या बाईकची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 1.70 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.