जुनी सायकल द्या अन् नवी E-Cycle मिळवा, कंपनी देतेय तब्बल २५ हजारांपर्यंतची बंपर सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:03 PM2022-01-11T22:03:18+5:302022-01-11T22:04:48+5:30

तुमच्या जुन्या सायकलला रामराम करून ई-सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक जबरदस्त ऑफर एका कंपनीनं आणली आहे.

buy new electric cycle against old cycle go zero mobility starts switch exchange offer discount upto 25000 | जुनी सायकल द्या अन् नवी E-Cycle मिळवा, कंपनी देतेय तब्बल २५ हजारांपर्यंतची बंपर सूट!

जुनी सायकल द्या अन् नवी E-Cycle मिळवा, कंपनी देतेय तब्बल २५ हजारांपर्यंतची बंपर सूट!

googlenewsNext

सध्याचा इलेक्ट्रीक वाहनांकडे ओढा वाढण्याचा काळ असताना आता इलेक्ट्रीक सायकलचंही प्रस्थ हळूहळू वाढत आहे. तुम्हालाही जर आता तुमच्या जुन्या सायकलला रामराम करून ई-सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक जबरदस्त ऑफर एका कंपनीनं आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमच्याकडील जुनी सायकल देऊन बदल्यात नवी कोरी ई-सायकल (E-Cycle) खरेदी करू शकणार आहात. यात तुम्हाला तब्बल २५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकणार आहे. 

इलेक्ट्रीक बायसिकल कंपनी (E-Bicycle) गो झीरो मोबिलीटीनं (Go Zero Mobility)नुकतंच 'स्विच' प्रोग्राम लॉन्च केला आहे. यात तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही ब्रँडची जुनी ७ ते २५ हजार रुपयांची सायकल एक्स्जेंच करू शकणार आहात. या बदल्यात तुम्हाला नवी कोरी ई-सायकल विकत घेता येणार आहे. तुमच्याकडील जुन्या सायकलच्या मोबदल्यात कंपनी तुम्हाला ई-सायकलवर ७ ते २५ हजारापर्यंतची सूट देणार आहे. कंपनीच्या इलेक्ट्रीक सायकलची रेंज १४ हजार रुपयांपासून सुरू होते. तर ४५,९९९ रुपयांची सर्वाधिक किमतीची अत्याधुनिक इ-सायकल देखील उपलब्ध आहे. 

देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ऑफर पोहोचविण्यासाठी गो झीरो कंपनीनं इलेक्ट्रीक वन, सारखी ट्रेडर्स, ग्रीव्ह ईव्ही ऑटोमार्ट आणि आर्येंद्र मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडसारख्या कंपन्यांसोबत करार देखील केला आहे. ही ऑफर १० जानेवारी २०२२ पासून ९ एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहे. 

Web Title: buy new electric cycle against old cycle go zero mobility starts switch exchange offer discount upto 25000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.