सेकंड हँड कार घेताय? कर्ज काढताना या गोष्टी नक्की तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:54 PM2019-05-02T15:54:06+5:302019-05-02T15:56:30+5:30

आठ-दहा लाख रुपये गुंतवून नवीन कार घेण्याचे बजेट नसेल तर सेकंड हँड कारचा पर्याय असतो. भारतात या वापरलेल्या कारचे मार्केट नव्या कारपेक्षाही तेजीत आहे.

buying a Second Hand Car? Check out these things while taking a loan ... | सेकंड हँड कार घेताय? कर्ज काढताना या गोष्टी नक्की तपासा...

सेकंड हँड कार घेताय? कर्ज काढताना या गोष्टी नक्की तपासा...

Next

आठ-दहा लाख रुपये गुंतवून नवीन कार घेण्याचे बजेट नसेल तर सेकंड हँड कारचा पर्याय असतो. भारतात या वापरलेल्या कारचे मार्केट नव्या कारपेक्षाही तेजीत आहे. यासाठी स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या बँका कर्जपुरवठा करतात. यासाठी ते सुलभ हप्त्यांची जाहिरातही करतात. जर तुम्ही अशी कार कर्जावर घेण्याचा विचार करत असाल तर तीचे रनिंग किती? अपघात झालेली कार आहे का? अशा प्रश्नांपेक्षा आणखी एक महत्वाचा प्रश्न असतो ते म्हणजे कर्ज घेताना घ्यावयाची काळजी. 


कर्ज घेताना बँका वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतात. बँकांना व्यवसायच करायचा असल्याने त्या ग्राहकांच्या फाय़द्याचे कधीच पाहणार नाहीत. पण त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतात. यामध्ये न भुलता त्यातलेत्यात आपल्या फायद्याचा पर्याय निवडायचा असतो. 


व्याज किती? 
वाहन कर्ज घेताना महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याजाची टक्केवारी. हे व्याज 10.50 ते 18 टक्क्यांपर्यंत वार्षिक आकारले जाते. यासाठी गाडीला झालेली वर्षे पाहिली जातात. कार घेताना ग्राहक ऑनलाईनही कर्जाचे व्याज पडताळू शकतात. एसबीआय सेकंड हँड कार लोनसाठी 12.60 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. तर एचडीएफसी 9.25 टक्क्यांपासून पुढे व्याज आकारते. या शिवाय कारची बाजारातील किंमतीच्या किती टक्के कर्ज मिळू शकेल याचाही विचार करावा. काही बँका 80 ते 85 टक्के रक्कमेचे कर्ज देतात. तर काही बँकां यापेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज देतात. 


 

कर्ज मंजुरी वेळखाऊ प्रक्रिया
नवीन कारच्या कर्ज मंजुरीसाठी जास्त वेळ लागच नाही. मात्र, जुन्या कारवर कर्ज मंजुरीसाठी खूप वेळ लागतो. कारण कारची मूळ मालक आणि नवीन मालक यांच्यामध्ये करार करावा लागतो. यानंतर कार नवीन मालकाच्या नावावर व्हावी लागते. हे कागदपत्र, इन्शुरन्स आदी नव्या मालकाच्या नावावर झाल्यानंतर कर्ज मंजुर केले जाते. या प्रक्रियेसाठी कमीतकमी 4 ते 5 दिवस लागतात. तर नवीन कार घेण्यासाठी केवऴ 1 दिवस लागतो. 

कर्जाचा कालावधी 
अनेक बँका 5 वर्षांसाठी कर्ज देतात. जर कार खुपच जुनी असेल तर हा कालावधी कमी होतो. हा कालावधी कारच्या प्रकृतीवरही अवलंबून असतो. जर देखभाल खर्च जास्त येणार असेल तर बँका कमी कर्ज देतात. जर कारचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असले तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज फेटाळण्य़ाचे प्रमाण जास्त असते. मग खासगी बँका किंवा फायनान्सचा पर्याय उरतो. या कारची तपासणी करण्य़ासाठी बँका निरिक्षक पाठवितात. तो कारसाठी किती कर्ज द्यायचे याचा निर्णय घेतो. 

कागदपत्रे तपासावीत
जुनी कार घेण्याआधी कागदपत्रे नीट तपासावीत. यासाठी आरटीओशीही संपर्क साधावा. गाडीचा क्रमांक आणि तिचा इंजिन क्रमांक हे तपासून घ्यावेत. यानंतरच ही कागदपत्रे बँकेकडे पाठवावीत. तसेच यापूर्वी कारचे मालक किती होते, यावरही कारचे लोन रक्कम अवलंबून असते. एकापेक्षा जास्त कारचे मालक झाले असतील तर कारची किंमत कमी होते.

 


कार विमा
बँका 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेल्या कारना कर्ज देत नाहीत. तसेच जर कागदपत्र विकणाऱ्याच्या नावावर नसतील तर बँका कर्ज देत नाहीत. यामुळे इन्शुरन्स नुतनीकरण करावा किंवा इन्शुरन्स ट्रान्सफर करून घ्यावा.

Web Title: buying a Second Hand Car? Check out these things while taking a loan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carbankकारबँक