'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 09:03 PM2023-12-24T21:03:02+5:302023-12-24T21:03:20+5:30
'भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे.'
नवी दिल्ली: मागील काही वर्षांमध्ये देशात EV वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंटला बळकट करण्यासाठी अनेक कंपन्या त्यांची आ वाहने लॉन्च करत आहेत. अलीकडेच 19 व्या ईव्ही एक्स्पो 2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी EV मार्केटबाबत मोठा दावा केला.
2030 पर्यंत देशात एक कोटी EV असतील
19 व्या ईव्ही एक्स्पो 2023 ला संबोधित करताना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या काही वर्षांत ईव्ही क्षेत्र वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, सध्या देशात 34.54 लाख EV वाहने नोंदणीकृत आहेत आणि 2030 पर्यंत देशभरात एक कोटीहून अधिक ईव्ही वाहने असतील, असा दावाही केला.
5 कोटी रोजगार निर्माण होतील
एवढंच नाही तर ईव्ही मार्केटच्या वाढीमुळे देशात 5 कोटी नोकऱ्याही निर्माण होतील, असे नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले. ते म्हणाले की, भारतामध्ये जगातील सर्वात जास्त ईव्ही वाहने तयार करण्याची क्षमता आहे. भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार योग्य पाऊल उचलत आहे. सरकार सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिकलाही ईव्हीमध्ये रुपांतरित करू इच्छित आहे. असे झाले तर देशासाठी खूप चांगली गोष्ट असेल, असंही ते यावेळी म्हणाले.