BYD Auto 3 EV उद्या होणार लाँच; या इलेक्ट्रिक गाड्यांना देणार टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:16 PM2022-10-10T17:16:57+5:302022-10-10T17:17:43+5:30
BYD Atto 3 EV launching in India on October 11: बिल्ड युअर ड्रीम उद्या भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD ऑटो 3 (BYD Atto 3) लाँच करणार आहे.
नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. यातच चिनी कार निर्माता कंपनी बीव्हायडी (BYD) उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी नवीन कार सादर करत आहे. बिल्ड युअर ड्रीम उद्या भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD ऑटो 3 (BYD Atto 3) लाँच करणार आहे. ही नवी कार देशातील इतर अनेक कारशी स्पर्धा करेल. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.....
कशी असेल BYD Atto 3 ?
या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये 49.92 kWh आणि 60.49 kWh चे दोन ब्लेड बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एका चार्जवर अनुक्रमे 345 किमी आणि 420 किमीपर्यंतचा पल्ला गाठता येतो. या कारची संभाव्य किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते. तसेच याची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीत सुरु होऊ शकते. भारतात या कारची कोणाशी होणार स्पर्धा हे जाणून घेऊया...
Tata Nexon EV
टाटाची Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. यात 40.5 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जो एका चार्जवर 437 किमी पर्यंत धावू शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 17.50 लाख ते 20.04 लाख रुपये आहे.
MG ZS EV
MG ZS EV एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन प्रकारांमध्ये येते. ज्यामध्ये 50.3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 174 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एका चार्जवर 461 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. याची किंमत 22.58 लाख ते 26.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
Hyundai Kona Electric
Hyundai ची Kona Electric देखील BYD Auto 3 ला टक्कर देऊ शकते. या कारमध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. ही EV एका चार्जवर 452 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. भारतात याची एक्स-शोरूम किंमत 23.84 लाख ते 24.02 लाख रुपये आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही 400
XUV400 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. कारला PSM इलेक्ट्रिक मोटरसह 39.4 kWh बॅटरी पॅक मिळेल, जो IP 67 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट-प्रूफ देखील आहे. ही कार 147hp पॉवर आणि 310 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 456 किमीपर्यंतची रेंज देईल. ते ताशी 150 किमी वेगाने धावू शकते.