BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:14 PM2022-09-02T16:14:52+5:302022-09-02T16:15:45+5:30

BYD e6 ELECTRIC MPV : या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते.

byd e6 electric mpv launch for personal use with best price | BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

googlenewsNext

नवी दिल्ली : BYD ही चिनी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कार e6 ELECTRIC MPV भारतात लाँच केली आहे. ही एक खाजगी कार आहे, जी सर्वसामान्यांच्या वापरासाठी लाँच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी BYD E6 EV फक्त एक व्यावसायिक कार म्हणून बाजारात लाँच करण्यात आली होती. या कारचे GL आणि GLX असे दोन व्हेरिएंट आहेत. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, BYD e6 EV ची सुरुवातीची किंमत 29.15 लाख रुपये आहे.

या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या कारचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर असणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 520 किमी पर्यंत प्रवास करू शकते. डीसी फास्ट चार्जिंगमुळे 35 मिनिटांत 30 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल आणि 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. या कारच्या दुसऱ्या व्हेरिएट GLX मध्ये 40 kW वॉल-माउंटेड AC फास्ट चार्जरचा ऑप्शन देखील आहे परंतु तो चार्ज करण्यासाठी 2 तास लागतील.

BYD e6 चे फीचर्स
BYD e6 MUV एक पाच सीटर कार आहे. ज्यामध्ये LED DRL, लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स, इन-बिल्ट नेव्हिगेशन, CN95 एअर-ब्लूटूथ आणि 10.1 चे रोटेटेबल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम बसविण्यात आले आहे, जे वायफायला कनेक्ट केले जाऊ शकते. या कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमची सुविधा देखील देण्यात आली आहे. कंपनी या कारसोबत 8 वर्षे किंवा 50,0000 किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देत ​​आहे.

Web Title: byd e6 electric mpv launch for personal use with best price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.