बीवायडीची सीगुल करणार टाटा, महिंद्राची बत्ती गुल! १०-१२ लाखांत येतेय तगड्या रेंजची ईलेक्ट्रीक कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:49 PM2023-08-18T12:49:26+5:302023-08-18T12:49:46+5:30
BYD ही कंपनी भारतात ई6 एमपीवी आणि ऐटो 3 एसयूवी विकत आहे. बीवायडीने आणखी दोन कार भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.
BYD Seagull EV India Launch: ईलेक्ट्रीक वाहने बनविणारी चीनची बडी कंपनी भारतात उतरली आहे. सुरुवातीला दोन भल्यामोठ्या इलेक्ट्रीक एसयुव्ही आणून श्रीमंत वर्गाला आकर्षित करत असताना आता सामान्य लोकांसाठी १० ते १२ लाखांत जबरदस्त रेंजची इलेक्ट्रीक कार आणण्याची तयारी करत आहे. BYD Seagull ही कार टाटाची बत्ती गुल करण्याची शक्यता आहे.
BYD ही कंपनी भारतात ई6 एमपीवी आणि ऐटो 3 एसयूवी विकत आहे. बीवायडीने आणखी दोन कार भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. याची नावे सीगल आणि सी लायन अशी आहेत. याचे ट्रेडमार्क करण्यात आले आहेत. सीगल ही कंपनीची एन्ट्री लेव्हल कार असण्याची शक्यता आहे.
भारतीय बाजारपेठेतील परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता, BYD आगामी काळात सीगल 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक किमतीत सादर करू शकते. यासोबतच सील नावाची प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान देखील आगामी काळात भारतीय रस्त्यांवर दिसू शकते.
BYD ची आगामी इलेक्ट्रिक कार सीगल 30 kWh आणि 38 kWh बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते आणि एका चार्जवर 305 किमी ते 405 किमीची रेंज देऊ शकते. 30 मिनिटांत 80 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे. चीनमध्ये या कारची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यामुळे भारतातही एक दोन लाखांच्या फरकाने या कारची किंमत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बीवायडी सीगलची लांबी 3780 मिमी, रुंदी 1715 मिमी आणि उंची 1540 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2500 मिमी आहे. फंकी दिसणार्या इलेक्ट्रिक हॅचबॅकला क्लोज्ड फ्रंट फॅसिआ, शार्प एलईडी हेडलाइट्स, मोठी विंडशील्ड, फ्लोटिंग रूफ डिझाइन, रूफ स्पॉयलर आणि कनेक्टेड टेललाइट्स मिळतात. BYD Seagull ला 12.8-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5-इंच इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील यासह अनेक वैशिष्ट्ये मिळतील.