पेट्रोल परवडेना! CNG किट लावायचेय? या गोष्टींवर जरूर विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:50 PM2021-03-29T16:50:33+5:302021-03-29T16:51:38+5:30

CNG kit installation in your car: तुमची कार कंपनी फिटेड सीएनजी कार नसणार आहे. यामुळे बाहेरून तुम्हाला सीएनजी किट लावावे लागणार आहे. पहिली बाब म्हणजे तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करते का नाही हे पाहणे गरजेचे आहे.

Can't afford petrol! Want to get a CNG kit installation? Think about these things ... | पेट्रोल परवडेना! CNG किट लावायचेय? या गोष्टींवर जरूर विचार करा...

पेट्रोल परवडेना! CNG किट लावायचेय? या गोष्टींवर जरूर विचार करा...

googlenewsNext

पेट्रोलच्या दरांनी (Petrol Rate hike) आकाश गाठले आहे. पुढेही वाढत राहण्याची शक्यता आहे. ज्यांनी डिझेल वाहने घेतलीत त्यांना काही पर्याय नाहीय. परंतू पेट्रोलकार घेतलेल्यांना त्यांची कार सीएनजी (CNG) लावून परवडणारा प्रवास करता येणार आहे. हा एक पेट्रोल कारचा फाय़दा आहे. अनेकजण आता तो विचार करत असून त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. अनेकजण कारमध्ये सीएनजी किट (CNG Kit) लावून घेत आहेत.  जर तुम्हीही विचारात असाल तर सीएनजी किट लावण्याबाबत काही गोष्टी नक्की ध्यानात घेणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. (things to know before installing CNG kit in old car.)


महत्वाचे म्हणजे तुमची कार कंपनी फिटेड सीएनजी कार नसणार आहे. यामुळे बाहेरून तुम्हाला सीएनजी किट लावावे लागणार आहे. पहिली बाब म्हणजे तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करते का नाही हे पाहणे गरजेचे आहे. अनेकदा जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावले की ती कार नंतर समस्या यायला, त्रास द्यायला सुरवात करते. यामुळे आधी तुम्ही सीएनजी कारला योग्य आहे की नाही ते पहावे लागणार आहे. 


देशात मारुतीशिवाय अन्य कोणत्याही कारला चांगल्या सीएनजी कार देणे जमलेले नाही. ह्युंदाईच्या काही कारना सीएनजी आहे. सीएनजी हे एक इंधन आहे. यामुळे याचा थेट संबंध इंजिनाशी येतो. सीएनजीमुळे इंजिनाचा परफॉर्मन्स खालावतो. यामुळे अनेक कंपन्यांची इंजिने सीएनजीसाठी योग्य नसतात. सीएनजीचा खर्च कमी होतो, मात्र, त्यामुळे इंजिनावर पडणारे प्रेशर जे असते ते खूप खर्च करायला भाग पाडू शकते. इंजिनाची ताकदही कमी होते. ही बाब तुमच्या कार चालविताना लक्षात येईल. ज्यांना कारचा परफॉर्मन्स आवडतो त्यांनी सीएनजी किट लावू नये. 


इन्शुरन्स क्लेम रद्द होऊ शकतो....
अनेकदा लोक त्यांच्या कारना सीएनजी किट लावून घेतात. मात्र, जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा त्यांचा इन्शुरन्स क्लेम नाकारला जातो. कारण तुमच्या कारचे मॉडेलमध्ये सीएनजी नसतो. कंपन्या तुमच्या कारचे मॉडेल पाहून इन्शुरन्स देतात. अशावेळी कंपन्यांची परवानगी घेऊन सीएनजी किट बसवावे. 

RTO
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आरटीओ. जर तुम्ही तुमच्या कारला सीएनजी किट लावत असाल तर त्याची माहिती तुमच्या आरटीओला द्यावी लागते. सीएनजीचे लायसन द्यावे लागते. तेव्हा जाऊन तुम्ही सीएनजी किट बसवू शकता. यासाठी सीएनजी किटचा अधिकृत डीलर लागतो. ते देखील पहावे लागते. 

Web Title: Can't afford petrol! Want to get a CNG kit installation? Think about these things ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.