सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:30 PM2022-02-25T14:30:23+5:302022-02-25T14:31:02+5:30
Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे.
नवी दिल्ली : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करण्यामागे अनेक कारणे असतात. नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील. तर जुन्या कारसाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. पण त्याचबरोबर तुम्हाला हाही विचार करावा लागेल की तुमच्या कष्टाचे पैसे त्यावर खर्च करणे योग्य आहे का? ती कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे.
सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे फायदे
सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. पहिल्यांदा म्हणजे जुन्या कारची किंमत नवीन EV पेक्षा खूपच कमी असेल. या गाड्या झिरो मेंटेनन्स आहेत, त्यामुळे त्यांच्या मेंटेनन्सची फारशी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना फारच कमी देखभालची आवश्यक आहे. या वाहनांची बाजारपेठ अजूनही खूपच लहान आहे, त्यामुळे इतर पूर्व-मालकीच्या वाहनांइतकी चिंतेची बाब असू शकत नाही. याचे निश्चितच काही तोटे असले तरी, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे खूप फायद्याचे ठरू शकते. जर तुम्हाला त्या कार मालकाबद्दल माहिती असेल तर यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. कारची माहिती मिळवून तुम्हाला चांगली डील करू शकता.
सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे नुकसान
ही जुने किंवा वापरलेली वाहने खरेदी करताना तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करताना, ती अद्याप वॉरंटी अंतर्गत आहे का आणि असल्यास, त्यावर किती वेळ शिल्लक आहे, हे तपासले पाहिजे. जर तसे नसेल, तर तुम्हाला ट्रान्सफर शुल्काची माहिती करून घ्यावी लागेल. तुम्ही बॅटरी तपासली पाहिजे जेणेकरून बॅटरीचे कोणतेही नुकसान होणार नाही, कारण ती बदलणे खूप महाग असू शकते. तसेच, कारवर काही रिकॉल झाले आहे का, ते तपासून घेतले पाहिजे आणि त्या कारचा परफॉर्मन्स तपासून पाहिला पाहिजे. जुन्या EV कारचा इलेक्ट्रिक चार्जर आणि चार्ज वेळ चेक केली पाहिजे. तसेच तुम्ही त्या कारची टेस्ट ड्राइव्ह घेऊन पाहू शकता. दरम्यान, यामध्ये अशा काही समस्या जाणवल्यास संबंधीत कार खरेदी करणे नुकसानदायक ठरू शकते.