या गोष्टीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा बॉम्बसारखी फुटू शकते तुमची कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:24 PM2023-01-23T12:24:44+5:302023-01-23T12:25:14+5:30
Car Care Tips: जर तुम्ही कार वापरत असाल तर तिची चांगल्या पद्धतीने देखभाल केली पाहिजे. तुम्ही कारची जेवढी चांगली देखभाल कराल, तेवढीच ती अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील.
जर तुम्ही कार वापरत असाल तर तिची चांगल्या पद्धतीने देखभाल केली पाहिजे. तुम्ही कारची जेवढी चांगली देखभाल कराल, तेवढीच ती अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील. तसं पाहायला गेलं तर कार मालकांनी बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मात्र आज आपण इतर बाबींऐवजी अशा गोष्टींची माहिती देणार आहोत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास कारमध्ये स्फोट होऊ शकतो. या बाबी पुढील प्रमाणे.
कारच्या इंजिनाचं तापमान - जर कारचं इंजिन अधिकाधिक गरम होत असेल, तर त्यामध्ये आग लागण्याची भीती असते. त्यासाठी कारमध्ये इंजिन थंड ठेवण्यासाठी विविध उपाय केलेले असतात. इंजिनाजवळ फॅन लावलेले असतात. ते इंजिनावर हवेचा मारा करून इंजिन थंड ठेवत असतात. आता जवळपास सर्व कारमध्ये इंस्ट्रुमेंट क्लस्टरवर इंजिनाच्या तापमानाबाबत इंडिकेशनही असते. यामध्ये लाइट दिलेली असते. ती लाल झाल्यास इंजिनाचं तापमान अधिक असल्याचं समजून जा. त्यामुळे इंजिनाची काळजी घ्या. इंजिन अधिक गरम झाल्यास कारमध्ये आग लागू शकते.
सीएनजी लिकेज - जर तुम्ही सीएनजी कारचा वापर करत असाल तर त्यामध्ये अनेकदा लिकेजचा धोका असतो. त्यामुळे सीएनजी कार वापरणाऱ्यांनी सीएनजी लिकेजबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच वेळोवेळी लिकेज चेक केला पाहिजे. त्याशिवाय जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता तेव्हासुद्धा लिकेजच्या स्थितीमध्ये दुर्गंध येऊ शकतो. त्याची काळजी घ्या. असं झाल्यास त्वरित कारपासून दूर जा आणि सीएनजी लिकेज दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक बोलवून घ्या. सीएनजी लिकेज कारमध्ये आग लागण्याचे कारण ठरू शकतो.
तसेच कारमध्ये धूम्रपान करणेही टाळले पाहिजे. जर कुणी व्यक्ती कारमध्ये धुम्रपान करत असेल आणि सीएनजी लिकेज झाला तर त्वरित आर लागू शकते. ही आग भयंकर रूप धारण करू शकते. तसेच त्यामध्ये कार फुटूसुद्धा शकते.