तुम्ही अन् तुमची फॅमिली राहील सुरक्षित; 'या' गाड्यांना सर्वाधिक सेफ्टी रेटिंग्स, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 06:28 PM2023-07-16T18:28:04+5:302023-07-16T18:28:28+5:30

Car Crash Test Rating: कार खरेदी करण्यापूर्वी क्रॅश टेस्ट संदर्भातील ग्लोबल एनसीएपी टेस्ट रेटिंग्स नक्की जाणून घ्या.

Car Crash Test Rating: Global NCAP Rating: You and your family will be safe; 'These' cars have the highest safety ratings | तुम्ही अन् तुमची फॅमिली राहील सुरक्षित; 'या' गाड्यांना सर्वाधिक सेफ्टी रेटिंग्स, पाहा...

तुम्ही अन् तुमची फॅमिली राहील सुरक्षित; 'या' गाड्यांना सर्वाधिक सेफ्टी रेटिंग्स, पाहा...

googlenewsNext

Global NCAP Safest Cars: आज बाजारात अनेक प्रकारच्याकार उपलब्ध आहेत. पण, बहुतांश ग्राहकांचे प्राधान्य सुरक्षित कारला असते. दरम्यान, कोणती कार सुरक्षित आहे, हे NCAP च्या क्रॅश टेस्टमधून समोर आले आहे. या चाचणीत जीप रेनगेड एसयूव्हीची कामगिरी सर्वात वाईट ठरली. या गाडीला फक्त 1 स्टार रेटिंग मिळाले. तसेच, देशातील Citroen C3 हॅचबॅक देखील NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल झाली आहे. NCAP कारच्या सुरक्षेबाबत रिपोर्ट जारी करते. ज्या कार सर्वात सुरक्षित आहेत, त्यांना 5 स्टार रेटिंग दिले जाते.

सर्वात सुरक्षित कार कोणती?
कार क्रॅश टेस्टचे प्रोटोकॉल बदलण्यात आले आहेत. तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर NCAP क्रॅश टेस्टबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे. नवीन प्रोटोकॉलनुसार, ज्या कारचे सेफ्टी रेटिंग चांगले आहे, ती कार तुम्ही निवडू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी एक सुरक्षित कार खरेदी करू शकाल. NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग असलेली कार सर्वात सुरक्षित मानली जाते.

कोणत्या कारला किती रेटिंग मिळाले?
ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार, फोक्सवॅगन व्हरटस, स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कुशाक कार सर्वात सुरक्षित आहेत. या कारला चाइल्ड सेफ्टी आणि अॅडल्ट सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या कार्सना चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 42 आणि अडल्ट सेफ्टीमध्ये 34 पैकी 29.64 गुण मिळाले आहेत. तसेच, या कारला क्रॅशच्या वेळी 83 पैकी 71.64 गुण मिळाले आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ एनदेखील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत आहे. या कारला चाइल्ड सेफ्टीमध्ये 3 आणि अडल्ट सेफ्टीमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. क्रॅस टेस्टमध्ये कारने 83 पैकी 58.18 गुण मिळवले आहेत. 

Web Title: Car Crash Test Rating: Global NCAP Rating: You and your family will be safe; 'These' cars have the highest safety ratings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.