कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 03:01 PM2024-12-01T15:01:11+5:302024-12-01T15:01:44+5:30

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमी कारमध्ये ठेवल्या पाहिजेत, मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल किंवा रोज ऑफिसला जात असाल...

Car Essentials For Long Drive and Trip Portable Tyre Inflator And Car Charger | कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!

कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!

नवी दि्ली : तुम्हीही कारने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारने लांबच्या प्रवासाला जाताना अनेकदा समस्या उद्भवतात, ज्याचा आधीच अंदाज लावता येत नाही. प्रवास करताना उद्भवणाऱ्या बहुतांश समस्या तुम्ही स्वत: सोडवू शकता, यासाठी तुम्हाला कोणत्याही मेकॅनिकची गरज नाही. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी कारमध्ये ॲक्सेसरीज असायला हव्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमी कारमध्ये ठेवल्या पाहिजेत, मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल किंवा रोज ऑफिसला जात असाल...

फोन होल्डर आहे आवश्यक! 
आजकाल कुठेही जाण्यासाठी मॅपचा वापर केला जातो. फोनवर मॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणे कार चालवताना त्रासदायक ठरते. दोन्ही ठिकाणी लक्ष व्यवस्थित ठेवता येत नाही. कारमध्ये चांगला फोन होल्डर असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन ई-कॉमर्सवर २०० ते ३०० रुपयांमध्ये मिळवू शकता.

पोर्टेबल टायर इन्फ्लेटर
अनेकवेळा प्रवासादरम्यान टायर पंक्चर होतो आणि जवळपास मेकॅनिकही नसतो. अशा परिस्थितीत हा टायर इन्फ्लेटर उपयुक्त ठरू शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या कारच्या टायरमध्ये स्वतः हवा भरू शकाल. दरम्या, आता कारमध्ये ट्यूबलेस टायर येऊ लागले आहेत, जे गरजेनुसार वापरता येतात.

प्रथमोपचार किट!
कार असो की बाईक, प्रत्येकाने प्रथमोपचार किट ठेवली पाहिजे. हे आपत्कालीन या परिस्थितीत वापरले जाऊ शकते, तुम्ही त्यात बँडेज, अँटीसेप्टिक, पेन किलर यासारखी औषधे ठेवू शकता. याशिवाय आवश्यक औषधे असणेही महत्त्वाचे आहे. तसेच, कारमध्ये टॉर्च ठेवावी, रात्री एकटे बाहेर जाताना टॉर्चचा खूप फायदा होतो.

Web Title: Car Essentials For Long Drive and Trip Portable Tyre Inflator And Car Charger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.