Car Insurence Claim: कार चोरीला गेली अन् एकच चावी असेल...; इन्शुरन्स क्लेमसाठी ही ट्रीक वापरा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 09:53 AM2022-12-23T09:53:05+5:302022-12-23T09:53:20+5:30
चोरीच्या कारचा दावा करण्यापूर्वी, भारतात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कार नवीन असेल की जुनी त्या कारचा इन्शुरन्स करावाच लागतो. यामुळे तुमची कार चोरीला गेली किंवा अपघात आदी नुकसान कमी होते. इन्शुरन्स करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यकही आहे. परंतू, जेव्हा आपण इन्शुरन्स क्लेम करतो, तेव्हा खरा त्रास सुरु होतो.
सामान्य नियमानुसार जर कार चोरी झाली तर त्याचा क्लेम करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीला गाडीच्या दोन्ही चाव्या सोपवाव्या लागतात. यानंतर काही कागदी प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला गाडीचा क्लेम मिळून जातो.
जर तुमची गाडी आणि चावी दोन्ही चोरील्या हेल्या असतील व तुमच्याकडे एकच चावी असेल तर काय? अशा परिस्थितीत कारचा इन्शुरन्स क्लेम मिळणे खूप कठीण असते. मात्र, एक उपाय असा आहे जो तुम्हाला एक चावी असली तरी कंपन्या इन्शुरन्स क्लेम फेटाळू शकत नाहीत.
चोरीच्या कारचा दावा करण्यापूर्वी, भारतात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम सर्वसमावेशक कार (कॉम्प्रेहेंसिव्ह) विमा येतो. हा विमा वाहन मालकाला मजबूत विमा संरक्षण देतो. थर्ड पार्टीचे नुकसान, अपघात जायबंदी, वाहनाचे नुकसान तसेच टक्कर न झालेले नुकसान देखील कव्हर करतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या कारला अधिक कव्हरेज प्रदान करतो. दुसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानीलाही कव्हर करतो.
जर तुमची कार चोरीला गेली असेल आणि तुमच्याकडे फक्त एकच चावी असेल तर तुम्ही या सोप्या युक्तीने त्यावर दावा करू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त विमा कंपनीचे समाधान करावे लागेल की तुमच्या कारची किल्ली हरवली आहे. एकदा विमा कंपनीने यास सहमती दिली की, तुम्ही दावा मिळवू शकता. काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने देखील ग्राहकांच्या बाजुने निकाल दिला आहे.