गाडीची चावी आत राहिली अन् लॉक झाली? सोप्या पद्धतीने करा अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 03:48 PM2022-12-03T15:48:51+5:302022-12-03T15:49:06+5:30

अनेकदा लोक कारच्या खिडकीची काच तोडून आपले नुकसान करून घेतात. गाडीच चावी राहिली आणि गाडी लॉक झाली तर काही ट्रिक आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. 

Car key forgot inside and locked? how to Unlock car door easily, see tips | गाडीची चावी आत राहिली अन् लॉक झाली? सोप्या पद्धतीने करा अनलॉक

गाडीची चावी आत राहिली अन् लॉक झाली? सोप्या पद्धतीने करा अनलॉक

googlenewsNext

धावपळीच्या जीवनात अनेकदा घर बाहेरून बंद केले जाते आणि चावी आतमध्ये राहते, तसेच कारची चावी आतमध्ये राहते आणि कार लॉक होते, असे प्रकार घडतात. आजकाल ज्या गाड्या येतात त्यांचा दरवाजा काही वेळात आपोआप लॉक होतात. जर तुम्ही घराजवळच असाल तर तुम्ही दुसऱ्या चावीची सोय करू शकता, परंतू प्रवासात असाल आणि असा प्रसंग आला तर काय कराल? 

अनेकदा लोक कारच्या खिडकीची काच तोडून आपले नुकसान करून घेतात. तर कधी डुप्लिकेट चावीदेखील बनवून घेतली जाते. परंतू तोपर्यंत तुम्हाला बाहेरच रहावे लागते. गाडीच चावी राहिली आणि गाडी लॉक झाली तर काही ट्रिक आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. 

इफ्लॅटेबल वेज म्हणजेच एअर पॅक म्हटले जाते. त्याच्या वापराने देखील दरवाजा उघडता येतो. कारच्या वरच्या भागात दरवाजा आणि कार यांच्यामध्ये हवा भरली जाते. जसजसा एअर पॅक फुगतो तसतसे कार आणि दरवाजा यांच्यामध्ये एक अंतर वाढायला लागते. यानंतर दरवाजाचे लॉक हुकच्या मदतीने उघडता येते.
प्लॅस्टिक स्ट्रीपचा वापर हा गाडी अनलॉक करण्याचा सर्वात सोपा प्रकार आहे. प्लॅस्टिक स्ट्रीपला फोल्ड करावे, ते कारच्या काचेतून किंवा दरवाजाच्या साईडमधून आतमध्ये घुसवावा. तो लॉकपर्यंत न्यावा आणि आत अडकवून खेचावा. घराच्या दरावाजाचे लॅच खोलताना देखील अशाच प्रकारे प्लॅस्टिक स्ट्रीपचा वापर केला जातो. 

वायर हँगरदेखील तुम्हाला मदतीला येईल. तो पूर्णपणे खोलून त्याचा शेवटचा भाग दुमडून ठेवावा. दरावाजातून आमध्ये घालून दरवाजाच्या लॉकच्या नॉबला ओढावे. 
शूजची लेसदेखील तुम्हाला कामी येऊ शकते. परंतू त्यासाठी जुन्या पद्धतीचे दरवाजाचा लॉक नॉब असावा लागतो. तो असेल तर लेसने फासासारखी गाठ मारावी आणि शूलेस आतमध्ये टाकून तो नॉब त्या फासात अडकवावा. फास आवळून दोन्ही दोऱ्या वर ओढाव्यात. 

Web Title: Car key forgot inside and locked? how to Unlock car door easily, see tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार