कारसारखी की-लेस, Honda Activa Smart स्कूटर लाँच; किंमतही कमी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 04:40 PM2023-01-23T16:40:54+5:302023-01-23T16:41:26+5:30
होंडाने अॅक्टिव्हाचे खूप खास व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये कारसारखी रिमोट की दिली आहे. म्हणजेच ही स्कूटर चावीशिवाय स्टार्ट करता येणार आहे.
देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होंडा अॅक्टिव्हा आता खूपच स्मार्ट झाली आहे. होंडाने अॅक्टिव्हाचे खूप खास व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये कारसारखी रिमोट की दिली आहे. म्हणजेच ही स्कूटर चावीशिवाय स्टार्ट करता येणार आहे.
होंडा अॅक्टिव्हा स्मार्टमध्ये अॅडव्हान्स सिक्यिुरिटी सिस्टिम देण्यात आली आहे. याला ‘H-Smart’ नावाने ट्रेडमार्क करण्यात आले आहे. ज्या लोकांना आपली स्कूटर कुठेही पार्क करावी लागते, त्यांना आता अॅक्टिव्हा स्मार्टचा खूप फायदा होणार आहे. त्यांची स्कूटर चोरीपासूनही वाचणार आहे.
Honda Activa Smart Key व्हेरिअंटबाबत सांगायचे झाले तर, ही स्कूटर 80,537 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच झाली आहे. या स्कूटरमध्ये 109.51 cc इंजिन देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, 3 स्टेप अॅडजस्टेबल स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक रिअर सस्पेंशन, 12 इंच फ्रंट आणि 10 इंच रीअर व्हील, दोन्ही चाकांवर 130 मिमी ड्रम ब्रेक आणि 1260 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे.
स्मार्ट की द्वारे तुम्ही स्कूटर लॉक-अनलॉक करू शकता, स्टार्ट करू शकता, बूट स्पेस ऍक्सेस करू शकता आणि इंधन लीड उघडू शकता. ऑटो-लॉक फंक्शन देखील या स्कूटरमध्ये देण्यात आले आहे. Honda Activa 6G च्या Activa 6G Standard आणि Activa 6G Deluxe या दोन्ही व्हेरिअंटची किंमत 1177 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यांच्यापेक्षा ही स्कूटर ३००० ते ६००० रुपयांनी महाग आहे.