Car Parking Brake: कार उभी केल्यावर हँड ब्रेक ओढायचा की नाही? की गिअरमध्ये ठेवायची; समज गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:42 PM2022-08-25T14:42:05+5:302022-08-25T14:42:37+5:30

Car Driving Tips: कार हँडब्रेकला इमर्जन्सी ब्रेक आणि पार्किंग ब्रेक या नावांनी देखील ओळखले जाते. पण त्याचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीत होतो की पार्किंगसाठीही वापरायचा?

Car Parking Brake: Should you pull the hand brake when parking the car or not? to put the key in gear; Misunderstanding... | Car Parking Brake: कार उभी केल्यावर हँड ब्रेक ओढायचा की नाही? की गिअरमध्ये ठेवायची; समज गैरसमज...

Car Parking Brake: कार उभी केल्यावर हँड ब्रेक ओढायचा की नाही? की गिअरमध्ये ठेवायची; समज गैरसमज...

googlenewsNext

तुम्ही अनेक हॉलिवूड, बॉलिवूड सिनेमांमध्ये हँडब्रेक लावून कार ड्रिफ्ट करताना पाहिली असेल. तुम्ही असा प्रयोग करू नका. हँडब्रेक हा इमरजन्सी परिस्थितीत वापरायचा असतो किंवा गाडी पार्क केल्यावर ती पुढे-मागे जाऊ नये म्हणून. या हँडब्रेकबाबत काही समज-गैरसमज आहेत. 

कार हँडब्रेकला इमर्जन्सी ब्रेक आणि पार्किंग ब्रेक या नावांनी देखील ओळखले जाते. पण त्याचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीत होतो की पार्किंगसाठीही वापरायचा? अनेकजण कार पार्क करताना हँड ब्रेक लावतात. अनेकजण हँडब्रेक लावल्यावर ब्रेक पॅडचे नुकसान होते, असे सांगतात. यामुळे त्यांच्या सांगण्यावरून बरेचजण गाडी गिअरमध्ये टाकून ठेवतात. हे चूक की बरोबर...

पार्किंग ब्रेक हा कारच्या ब्रेकिंग सिस्टिमचाच भाग आहे. तो मागच्या ब्रेकला जोडलेला असतो. जेव्हा आपण हँडब्रेक ओढतो तेव्हा तो मेन ब्रेकपेक्षा थोडा कमी दाब टाकतात. पार्किंग ब्रेक ही दुसऱ्या क्रमांकाची ब्रेकिंग सिस्टिम असते. यामुळे तो ओढलेला असला तरी कार हळू हळू पुढे जाते. हा ब्रेक लावून गाडी चालवली तर तुम्हाला लाल लाईट आणि एक प्रकारचा बीप आवाजही येतो. 

या पार्किंग ब्रेकचा वापर कारची मेन ब्रेकिंग सिस्टिम फेल झाली की करता येतो.  परंतू आता त्याचा वापर मुख्यत्वे वाहन पार्क केले की ते पुढे-मागे जाऊ नये म्हणून केला जातो. हे योग्य आहे का? तर हो. जेव्हा तुम्ही कार पार्क कराल तेव्हा हँड ब्रेक लावा. हँड ब्रेकला या कारणास्तव पार्किंग ब्रेक देखील म्हणतात. अनेकांना असे वाटते की उतारावर असतानाच पार्किंग ब्रेक लावायचा असतो. तुमची कार मॅन्युअल असो वा ऑटोमॅटिक, डोंगराळ प्रदेश असो किंवा विमान असो, तुम्ही प्रत्येक वेळी पार्क करताना तुमचा पार्किंग ब्रेक वापरावा. गिअरमध्ये ठेवल्यास गिअर आणि इंडिनवर त्याचा दाब पडतो, यामुळे गिअर किंवा इंजिन फेल सारख्या समस्या उद्भवू शकतात. 

Web Title: Car Parking Brake: Should you pull the hand brake when parking the car or not? to put the key in gear; Misunderstanding...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार