कार विकायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स, विक्रीतून मिळेल घसघशीत रक्कम 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 03:44 PM2023-02-18T15:44:21+5:302023-02-18T15:44:42+5:30

Second Hand Car Sale: तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या सेकंड हँड कारच्या विक्रीतूनही चांगली रक्कम मिळू शकते.

Car Sale: Want to sell a car? Follow these simple tips, you will get huge amount of money from sales | कार विकायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स, विक्रीतून मिळेल घसघशीत रक्कम 

कार विकायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स, विक्रीतून मिळेल घसघशीत रक्कम 

googlenewsNext

कारचे नवनवे मॉडेल्स जससजे बाजारात येतात तसतसे लोक आपल्या कारनां अपग्रेड करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या सेकंड हँड कारच्या विक्रीतूनही चांगली रक्कम मिळू शकते.

काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म कार एका दिवसामध्ये खरेदी करतात. तर ओएलएक्ससारख्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या कारची फ्रीमध्ये जाहिरात करून ती सहजपणे विकू शकता. आणखी एक चांगला पर्याय म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या कारला अपग्रेड कराल तेव्हा जवळपास प्रत्येक कंपनी तुम्हाला एक्स्चेंज ऑफर देते. त्यात तुम्ही कार एक्सचेंजसुद्धा करू शकता. त्यात तुम्हाला डाउन पेमेंटमध्ये होतो. खालील काही गोष्टींचा विचार केल्यास कार विकताना चांगला फायदा होऊ शकतो.

- कार विकण्यापूर्वी कारची सर्व्हिस करून घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून घ्या. इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि फ्युएल फिल्टर बदलून घ्या. इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि फ्युएल फिल्टर बदलून घ्या. त्याबरोबरच डेंटरजवळ कारमधून येणारा आवाजही दुरुस्त करून घ्या. बराच काळ कार वापरल्यानंतर गेट खिडकी आणि फेंडर्समधून आजाव येऊ लागतो. डेंटर त्यांना काही वेळात दुरुस्त करेल.
- कारची सर्व्हिस हिस्ट्री काढा. त्यातून तुम्ही कार मेंटेन केलेली आहे  आणि योग्य वेळी तिची सर्व्हिसिंग केलेली आहे हे समजेल. तसेच मेंटेन केलेल्या कारची किंमत नेहमी चांगली मिळते.
- कार विकण्याआधी पहिल्यांदा त्यावर टचिंग करा. कुठे स्क्रॅच किंवा डेंट आले असतील तर ते दुरुस्त करा. त्याबरोबरच रबिंग आणि पॉलिशसुद्धा करा. ते तुमच्या कारला एकदम नव्यासारखी करेल. तसेच अशा कारकडे खरेदीदार आकर्षित होईल. 
- कारच्या इंटिरियरवरही लक्ष असू द्या. कारला ड्रायक्लीन करून घ्या. त्यामुळे कारची प्रॉपर क्लिनिंग होईल. तसेच एक फ्रेश फिल मिळेल. 
- काक विकण्याआधी टायर तपासून घ्या. कारचे टायर खराब झाले असतील तर बदलून घ्या. टायर हा असा भाग आहे, ज्यावर खरेदीदारचं पहिलं लक्ष जातं. 
- बराच काळ कार वापरल्यानंतर हेडलाइट्सची शाइन कमी होते. तसेच त्या पिवळ्या दिसू लागतात. त्यासाठी हेडलाइट्सची बफिंग करून घ्या. बफिंगनंतर हेडलाइट्स एकदम नव्यासारख्या चमकतील. 
कारच्या एसीची सर्व्हिस अवश्य करून घ्या. ही कार दर दिवशी वापरण्यासारखं फिचर आहे, तसेच लोक एसीच्या परफॉर्मंन्सवर खूप लक्ष देतात. थंडावा देणाऱ्या कारमधून बसून कुणालाही आरामदायक वाटते.  

Web Title: Car Sale: Want to sell a car? Follow these simple tips, you will get huge amount of money from sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.