Car Servicing Tips: सर्व्हिस सेंटरमध्ये जावे की लोकल मॅकेनिक? कोणाकडे गेल्यास होईल फायदा, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 03:21 PM2021-12-26T15:21:21+5:302021-12-26T15:23:44+5:30
company authorized service center VS local mechanic: अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि स्थानिक मेकॅनिक या दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सर्व्हिसिंग करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे खूप महत्वाचे आहे आणि त्याचा परिणाम वाहनाच्या मायलेजवर होतो. आजकाल सर्वत्र कार सर्व्हिसिंग केली जात आहे. अनेकांना कंपनीच्या सेवा केंद्रातच सेवा घेणे योग्य वाटते, तर बरेच लोक स्थानिक मेकॅनिकवर अधिक अवलंबून असतात. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की जर तुम्ही कार, दुचाकी अधिकृत सर्व्हिस सेंटर किंवा स्थानिक मेकॅनिककडून सर्व्हिसिंग करून घेतली तर तुम्हाला फायदा होईल.
अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि स्थानिक मेकॅनिक या दोघांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सर्व्हिसिंग करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
कंपनीचे सर्व्हिस सेंटर
जर तुमची कार नवीन असेल किंवा सर्व्हिसिंग मोफत असेल, तर तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही थेट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्यावी. ज्यांच्याकडे प्रीमियम वाहने आहेत त्यांना सर्व्हिस सेंटरवर कार सर्व्हिसिंग करून घेण्याचा फायदा अधिक आहे. नवीन पिढीची वाहने खूप प्रगत आहेत. हे ECU, इंधन प्रणाली, इग्निशन आणि कारमधील मनोरंजन प्रणाली यांसारख्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींनी सुसज्ज आहेत. त्यामुळे जर तुम्ही कंपनीने चिन्हांकित केलेल्या सेवा केंद्रात गेलात तर तुम्हाला चांगली सेवा मिळेल याची खात्री बाळगता येईल.
कार विकताना फायदा मिळेल
अधिकृत सेवा केंद्रातून तुमची कार सर्व्हिस करून घेण्याचे काही चांगले फायदे आहेत. अधिकृत सेवा केंद्रावर कारची सर्व्हिसिंग केल्याने तुमच्या कारचा इतिहास तयार होतो, ज्याची कार पुनर्विक्री करताना आवश्यकता असते. यामुळे तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते.
स्थानिक मेकॅनिकद्वारे सर्व्हिसिंग
स्थानिक मेकॅनिक हा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरपेक्षा कमी दरात वाहनाची संपूर्ण सर्व्हिसिंग करतो. दैनंदिन सेवेत कोणतीही अडचण नाही, अशावेळी तुम्ही स्थानिक मेकॅनिककडे जाऊन खूप पैसे वाचवू शकता. परंतु जेव्हाही तुम्ही स्थानिक मेकॅनिककडून तुमच्या कारची सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या वाहनात सर्व्हिसिंग करताना लागणारे स्पेअर्स आहेत याची खात्री करा. सुटे भाग, ऑईल आणि फिल्टर हे ओरिजनल असणे आवश्यक आहे.
फायदे
स्थानिक मेकॅनिककडून सर्व्हिसिंग केल्याने थेट मजुरीच्या खर्चात बचत होते, जर ओरिजनल स्पेअर्स वापरले गेले तर पार्ट्स आणि तेलाची किंमत सारखीच राहील. परंतु तुमच्या वाहनाची इत्यंभूत माहिती असलेल्या मेकॅनिककडेच जावे. अन्यथा अर्धवट माहिती असलेल्याकडे गेल्यास तुमचा त्रास वाढू शकतो. अनेक कंपन्यांचे तंत्रज्ञान वेगवेगळे असते. सध्या गाड्यांमध्ये सेन्सर येतात. यामुळे त्याचे सॉफ्टवेअर असलेले मेकॅनिक तुमची गाडी चांगली सर्व्हिस करू शकतात.