कार स्पॉयलर्स - दिखाऊपाणासाठी नव्हे तर हवा कापण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 09:00 AM2017-08-29T09:00:00+5:302017-08-29T09:00:00+5:30

कार स्पॉयलर्स हे काही शोबाजीतचे देखाव्याचे साधन नाही. कारला होणारा हवेचा अवरोध कमी करण्याचा तो शास्त्रीय प्रकार आहे. उगाच चांगले दिसण्यासाठी ते लावणअयाने काहीच उपयोग होत नाही

Car Spoilers - Not to showcase, but to cut air | कार स्पॉयलर्स - दिखाऊपाणासाठी नव्हे तर हवा कापण्यासाठी

कार स्पॉयलर्स - दिखाऊपाणासाठी नव्हे तर हवा कापण्यासाठी

ठळक मुद्देमोटारीला होणारा हवेचा अवरोध कसा कमी होईल,त्यादृष्टीने कार स्पॉयलरची रचना केली गेली.हवेमुळे मोटारीची गती कमी होता उपयोगाची नसल्याने रेसिंग कारसाठी स्पॉयलर्स ही आवश्यक बाब मानली जाते. स्पॉयलरचे वजन किती हवे त्याचाही विचार त्या मोटार उत्पादक कंपन्यांनी केलेला असतो.

कार गतीमान असते, तेव्हा समोरून येणाऱ्या हवेला ती कापत जात असते. ही हवा कापत जाण्याची त्या मोटारीची क्रिया होत असली तरी मोटारीचा आकार त्या हवेला कशा प्रकाराने पार करण्यास मदत करतो तेही महत्त्वाचे असते. ही क्रिया सुलभ व्हावी यासाठी त्या क्रियेमध्ये असणारा मोटारीचा आकार हा अडथळे आणणारा असतो. त्या मोटारीच्या आकाराला आज एरोडायनॅमिक आरेखनाने तयार केले गेले असले तरीही हवेचा हा जोर कमी करण्यासाठी त्याला काही साधन लावता येईल का, मोटारीला होणारा हवेचा अवरोध कसा कमी होईल,त्यादृष्टीने कार स्पॉयलरची रचना केली गेली. पण आज अनेक कारना कार विकत घेतल्यानंतर काहीजण स्पॉयलर्स लावतात. स्वतंत्रपणे लावत असतात. इतकेच नाही तर काही कार उत्पादकांनी इनबिल्ड असे हे स्पॉयलर्स लावून दिले आहेत. परंतु, ते शास्त्रीय कारण लक्षात घेऊन किती लावले गेले आहेत, हा खरा प्रश्न आहे, केवळ शोबाजी करण्यासाठी स्पॉयलर्स लावण्याने काही फरक पडत नाही, किंबहुना त्.याने अडथळाच तयार होऊ शकतो. रेसिंगमधील मोटारींना अशा प्रकारचे स्पॉयलर्स लावले जातात कारण त्यांना हवेचा अवरोध कमी करून गती वाढवायची असते, गती कायम ठेवायची असते. हवेमुळे मोटारीची गती कमी होता उपयोगाची नसल्याने रेसिंग कारसाठी स्पॉयलर्स ही आवश्यक बाब मानली जाते. 
आज अनेक वाहनांना अशा प्रकारते स्पॉयलर्स लावलेले दिसतात. काही मोटारींना त्यांच्या उत्पादक कंपन्यांकडूनच त्याची रचना केलेली आढळते. अर्थात मोटार उत्पादक कंपन्यांकडून दिलेले हे साधन त्यांच्या आरेखनाच्या दृष्टीने विचार करून बसविलेले असतात. त्या स्पॉयलरचे वजन किती हवे त्याचाही विचार त्या मोटार उत्पादक कंपन्यांनी केलेला असतो. वा करायला हवा. मात्र अनेकदा आपल्या मोटारीला असे स्पॉयलर बसविण्याची कृती केवळ हौस म्हणून करणारे लोक कमी नाहीत. मुळात त्यामागील शास्त्रीय कारण लक्षात घ्यायला हवे. मोटारीचे पंख वाटावेत अशा रेखीव -देखीव विचारांनी स्पॉयलर बसविण्याचे काम छानपणे केलेल्या मोटारी दिसून येत असतात. पण त्या स्पॉयलर्सना काहीच अर्थ नसतो. किंबहुना त्यांच्या अस्तित्वाने अशा मोटारींच्या गतीला बाधा येथे. हवा कापण्याच्या क्रियेतच अडथळा निर्माण होतो. यासाठीच आपल्या मोटारीला रेखीवपणा आणण्यासाठी या स्पॉयलरना बसविणे हे चुकीचे आहे, ही बाब लक्षात घ्यायला हवी. 
विशेष करून महामार्ग, द्रुतगती मार्ग यावरून मोटारी धावताना साधारण प्रति ताशी ८० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जात असतात.त्यांना हवेचा होणारा अवरोध कापून पुढे जायचे असते त्यावेळी अशा प्रकारच्या स्पॉयलर्सचा वापर खऱ्या अर्थाने होतो. जोरदार वारा वा वादळ असताना मोटारीला होणारा हवेचा अवरोध हा काहीवेळा चालकाच्यासाठी नियंत्रणाच्या कामात अडथळा आणणाराही ठरू शकतो.तेव्हा या प्रकारचे स्पॉयलर्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. हे स्पॉयलर्स एबीएस प्लॅस्टिक, फायबरग्लास, सिलिकॉन, कार्बन फायबर या मूळ सामग्रीपासून बनविले जातात. या सर्व प्रकारात मोटार उत्पादक कंपन्या एबीएस प्लॅस्टिकपासून तयार केलेले स्पॉयलर्स वापरतात.यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री काहीशी स्वस्त असली तरी तुटणारी असते. 
स्पॉयलर हे प्रथमत: अस्तित्वात आले ते व्हेल टेल या नावाने. जणू मोटारीचा शेपटाचा भाग हा व्हेल माशाप्रमाणे वाटावा तो आकर्षक दिसावा यातून व त्याच्या गुणधर्मातून. त्यानंतर डक टेलचा आकार या स्पॉयलरने घेतला. साधारण १९७३ च्या दरम्यान ही स्पॉयलरची कल्पना अंमलात आलेली दिसते. इलेक्ट्रॉनिकद्वारा नियंत्रित करता येणारी ही स्पॉयलरची रचना होती. पोर्शे ९११ या प्रकारच्या मोटारीच्या या टेलने स्पॉयलर्सला फॅशन म्हणून रूढ केले. 
काही असले तरी मूळ कल्पनेला बगल देणारा शब्द म्हणजे विंग किंवा पंख अशा संकल्पनेतून स्पॉयलरकडे पाहिले गेले. ते चुकीचे वा गोंधळात टाकणारा भाग म्हणावा लागेल. कारण आज खास करून रेसिंग कारसाठी शास्त्रीय तत्त्वातून वापरला जाणारा हा स्पॉयलर टेल या अर्थाने भारतात दिसून येतो. त्याचा वापर येथे प्रवासी वाहनांसाठी किती आवश्यक आहे ती बाब येथील रस्ते व त्यांची स्थिती पाहाता अनाठायी म्हणावी लागेल.

Web Title: Car Spoilers - Not to showcase, but to cut air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.