कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 09:46 AM2023-07-14T09:46:47+5:302023-07-14T09:47:04+5:30
Car Washing Tips: आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे
आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे किंवा कार वारंवार धुवावी लागू नये, यासाठी प्रयत्न करा. कार वारंवार पाण्याने धुतल्याने काय काय नुकसान होऊ शकते, याबाबतची माहिती घेऊया.
रंगाचं नुकसान - वारंवार पाण्याने धुतल्याने कारच्या रंगाचं नुकसान होऊ शकते. पाण्यात असलेली रसायने आणि खनिजांमुळे रंग खराब होऊ शकतो. त्यावर चिरा जाऊ शकतात. तसेच रंगाची चमकही कमी होऊ शकते.
गंज लागणे - कार वारंवार पाण्याने धुतल्याने कारला गंज चढू शकतो. तसेच हे पाणी कारच्या बॉडीमधील छोट्या छोट्या छिद्रांमध्ये जाऊन तिथेही गंज लागू शकतो.
इलेक्ट्रॉनिक्सचं नुकसान - वारंवार पाण्याने धुतल्याने कारच्या इलेक्ट्रॉनिक्सलाही नुकसान होऊ शकतं. पाणी कारच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसू शकते. तसेच हे भाग खराब होऊ शकतात.
धुलाईचा खर्च - सर्वसाधारणपणे पाण्याने कार धुण्यासाठी लोक कार वॉशिंग सेंटरमध्ये जातात. तिथे कार धुण्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे खर्च वाढतो.
नुकसान टाळण्यासाठी उपाय
१ - कारला खासकरून तिच्यासाठी बनवण्यात आलेल्या शाम्पूचा वापर करूनच धुतले पाहिजे.
२ - कार धुण्यासाठी खाऱ्या पाण्याचा वापर करू नका.
३- कार धुण्यासाठी सॉफ्ट ब्रश किंवा स्पंजचा वापर करा
४ - कार धुतल्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घ्या
५ - कार उन्हामध्ये सुकवून घ्या
६ - सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार वारंवार धुणे टाळा