सावधान...! हे पाच नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी लायसन जप्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:47 PM2020-02-26T14:47:05+5:302020-02-26T14:58:57+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात.
वाहतुकीचे नियम मोडताच वाहतूक पोलिस हात दाखवून बाजुला थांबण्य़ास सांगतात किंवा कॅमेरा असेल तर डायरेक्ट चलनाची पावती घरी येते. पण काही नियम असे आहेत जे तोडल्यास तुमचे लायसन थेट तीन महिन्य़ांसाठी जप्त केले जाऊ शकते. बऱ्याचदा हे माहितीही होत नाही, एखादा अपघात झाल्यास जेव्हा इन्शुरन्स कंपन्या विमा नाकारतात तेव्हा डोक्यावर हात मारायची वेळ येते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात.
बऱ्याचदा शहरामध्ये पदपथांवरून स्कूटर चालविल्या जातात. तर काही ठिकाणी डिव्हायडर उंचीला छोटा असेल तरीही त्यावरून बाईक हाकली जाते. तसेच काहीवेळा कमी उंचीच्या डिव्हायडरवरून कार दुसऱ्या बाजुला वळवली जाते. अशावेळी सापडल्यास लायसन तीन महिन्यांसाठी जप्त होऊ शकते.
मोटारसायकल किंवा स्कूटर चालवत असताना दोन कारच्या किंवा वाहनांच्यामधून मार्ग काढला जातो. ही ट्रीक नेहमीच फायद्याची असते. मात्र, जर असे करताना स्कूटरचा वेग ठरविलेल्या लेन बदलाच्या वेगापेक्षा जास्त असेल तर लायसन जप्त होऊ शकते. 40 किमीचा वेग मर्यादा असलेल्या रोडवर ठीक आहे. पण हायस्पीडच्या रोडवर असे केल्यास अडकण्याची शक्यता आहे.
अँबुलन्सला रस्ता रोखल्य़ास तुमचे लायसन निलंबित होऊ शकते. शिवाय नव्या नियमांनुसार 5 ते 10 हजारांचा दंडही होणार आहे. याची तक्रार कोण करणार असा प्रश्न पडला असेल तर सध्याच्या अँम्बुलन्स हायटेक आहेत. तिच्या पुढे आणि पाठीमागे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यामध्ये आढळल्यास चलन फाडले जाऊ शकते.
सार्वजनिक रोडवर रेसिंग करताना आढळल्यास ट्रॅफिक पोलिस लायसन जप्त करतात. जर तुम्हाला रेसिंगचा छंद असेल तर रेसिंग ट्रॅकवर जावे लागेल. मात्र, तुमच्या शहरात हे ट्रॅक नसतील आणि सामान्य रोडवर कायदा तोडल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो.
जेव्हा वाहन बनविले जाते तेव्हा त्यावर आवाजाच्या नियमांनुसार हॉर्न बसविलेले असतात. मात्र, नंतर काहीजण आवड म्हणून बदलतात. या हॉर्नची आवाजाची मर्यादा ओलांडल्यास लायसन जप्त होऊ शकते.