मारुती सुझुकीची सेलेरिओ एक्स..सेलेरिओचे फेसलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 09:54 AM2017-12-04T09:54:29+5:302017-12-04T11:17:17+5:30

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या मोटारींची कंपनी. सेलेरिओ या हॅचबॅकचे फेसलिफ्ट नुकतेच त्यांनी सादर केले आहे. काही कॉस्मेटिक बदल करून आणलेली ही सेलेरिओ केवळ बाह्य वैशिष्ट्याने आकर्षक बनवली आहे.

celerio x ... facelift of maruti suzuki`s celerio`s | मारुती सुझुकीची सेलेरिओ एक्स..सेलेरिओचे फेसलिफ्ट

मारुती सुझुकीची सेलेरिओ एक्स..सेलेरिओचे फेसलिफ्ट

googlenewsNext
ठळक मुद्देमारुती सुझुकीची सेलेरिओ ही छोटी हॅचबॅक भारतात बऱ्यापैकी दिसून लागली असली तरी ९९८ सीसी क्षमतेच्या इंजिनाची ही हॅचबॅक आता मारुतीने फेसलिफ्ट करून सेलेरिओ एक्स या नावाने बाजारात आणली आहे.मूळ सेलेरिओची तांत्रिक वैशिष्ट्ये मात्र या फेसलिफ्टमध्ये कायम आहेत.

मारुती सुझुकीची सेलेरिओ ही छोटी हॅचबॅक भारतात बऱ्यापैकी दिसून लागली असली तरी ९९८ सीसी क्षमतेच्या इंजिनाची ही हॅचबॅक आता मारुतीने फेसलिफ्ट करून सेलेरिओ एक्स या नावाने बाजारात आणली आहे. हॅचबॅकला काहीसे क्रॉसओव्हर रूरप देण्याचा बाह्य प्रयत्न यशस्वी झाला आहे खरा पण काही झाले तरी ती छोट्या ताकदीचीच हॅचबॅक आहे, हे खरेदीदाराने विसरू नये. बाह्य रुपामध्ये बरेच बदल करून सेलेरिओला आकर्षक बनवले आहे. मूळ सेलेरिओची तांत्रिक वैशिष्ट्ये मात्र या फेसलिफ्टमध्ये कायम आहेत.

अंतर्गत व बाह्य स्वरूपातील कॉस्मेटिक बदल हे या सेलेरिओ एक्सचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा सेलेरिओच्या मूळ रुपापेक्षा वेगळे रुप असावे असे ज्याना वाटते त्यांना ही सेलेरिओ एक्स आवडू शकेल.

नवे काय
- फ्रंट ग्रीलचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले बदल यात दिसतात.
- कारच्या दोन्ही बाजूला तळात क्लॅडिंग दिले आहेत.
- काळ्या रंगाच्या क्लॅडिंगमुळे आकर्षक रंग मूळ रंगाबरोबर दुहेरी पद्धतीत दिसतो.
- हेडलॅम्प, फॉग लॅम्प व ग्रील यांना काळ्या रंगाच्या थीममध्ये बसवले आहे.
- रुफ रेल देऊन अधिक स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न
- वरच्या श्रेणीला अलॉय व्हील्स
- अंतर्गत रचनेत आसनांना सौदर्यपूर्णता
- काळ्या रंगाच्या क्लॅडिंग व अन्य बाबींद्वारे दुहेरी रंगाची संगती

तांत्रिक वैशिष्ट्ये
- पेट्रोल इंजिन- के १० व- ९९८ सीसी , ३ सिलिंडर,
- पेट्रोल, बीएस ४,
- कमाल ताकद - ६७ बीएचपी @ ६००० आरपीएम
- कमाल टॉर्क - ९० एनएम @ ३५०० आरपीएम
- गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. ऑटो गीयरमध्येही वरच्या श्रेणीत उपलब्ध
- लांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३६९५ / १६०० / १५६०
- व्हीलबेस - २४२५ मी
- टर्निंग रेडियस - ४.७० मी
- ग्राऊंड क्लीअरन्स - १६५ मिमि.
- बूट स्पेस - २३५ ली.
- ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रम
- इंधन टाकी क्षमता - ३५ लीटर
- टायर व व्हील - १६५ /७० आर १४ अलॉय रिम
- स्टिअरींग - इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग
- किंमत ४.५७ लाख ते ५.४२ लाख रुपयांच्या दरम्यान, विविध श्रेणीनिहाय (एक्स शोरूम - दिल्ली) -
 

Web Title: celerio x ... facelift of maruti suzuki`s celerio`s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.