Maruti Vitara Brezza : वॉरंटी, फ्री सर्व्हिस आणि फायनान्ससह अर्ध्या किमतीत मिळतेय मारुती विटारा ब्रेझा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:36 PM2023-02-27T19:36:26+5:302023-02-27T19:36:56+5:30
Maruti Vitara Brezza : सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते.
मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) सर्वात यशस्वी कारपैकीमारुती सुझुकी विटारा ब्रेझा ही एक आहे. अलीकडेच कंपनीने ब्रेझा आणि ग्रँड विटारा नावाच्या दोन एसयूव्ही (SUV) लाँच केल्या आहेत. पण, जुनी विटारा ब्रेझा आजही मोठ्या संख्येने बाजारात आहे.
जर तुम्हाला ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) आवडत असेल आणि त्याचा चांगला पर्याय शोधत असाल, तर येथे विटारा ब्रेझा उपलब्ध असलेल्या डीलचे डिटेल्स आहेत. ज्यामध्ये तुम्हाला ही एसयूव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकते.
सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते, ज्यामध्ये तुम्ही या एसयूव्हीवर मिळणाऱ्या ऑफरचे संपूर्ण डिटेल्स वाचू शकाल.
मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची संपूर्ण माहिती
मारुती सुझुकी विटारा ब्रेझावरील ऑफर Maruti Suzuki True Value वर उपलब्ध आहे. विटारा ब्रेझाचे 2018 मॉडेल विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. ही एसयूव्हीची ओनरशिप सेंकड हँड आहे. या एसयूव्हीचे रजिस्ट्रेशन राजस्थानमधील आहे. हे मारुती सुझुकी विटारा ब्रेझा व्हेरियंट VDI आहे, जे डिझेल इंजिनसह येते. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे आणि आतापर्यंत 57,236 किमी चालवले आहे.
मारुती सुझुकी विटारा ब्रेझावर काय ऑफर आहेत?
सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाच्या या 2018 मॉडेलची किंमत 5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि कंपनी ते खरेदी करताना अनेक ऑफर देखील देत आहे. ज्यामध्ये गॅरंटी, वॉरंटी आणि फायनान्स प्लॅनचा समावेश आहे. जर एखाद्या ग्राहकाने ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा SUV खरेदी केली तर कंपनी सहा महिन्यांची वॉरंटी, 3 फ्री सर्व्हिस आणि फायनान्स प्लॅन देत आहे.
एसयूव्हीचे मायलेज 24.29 किलोमीटर प्रति लीटर
मारुती सुझुकी विटारा ब्रेझावरील ही ऑफर वाचल्यानंतर, तुम्हाला या एसयूव्हीचे इंजिन आणि मायलेजचे डिटेल्स माहित असले पाहिजेत. मारुती सुझुकी विटारा ब्रेझा 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1248 cc डिझेल इंजिन देण्यात आले आहे. या एसयूव्हीचे मायलेज 24.29 किलोमीटर प्रति लीटर आहे, जे ARAI ने प्रमाणित केले आहे.