कार कोणत्या कंपनीची हे दर्शवणारा आकर्षक लोगो अद्यापही लोकांच्या मनात ठसलेलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 06:00 PM2017-08-31T18:00:00+5:302017-08-31T18:00:00+5:30

कारनिर्मात्या कंपनीचा एम्ब्लेम वा लोगो हा अनेकांच्या मनात ठसलेला असतो. अनेक जागतिक स्तरावरील या कार निर्मात्या कंपन्यांचे लोगो हीच लोकांच्या मनातील कंपनीची ओळख बनललेली असते.

The charming logo that shows this company's car is still unmistakable | कार कोणत्या कंपनीची हे दर्शवणारा आकर्षक लोगो अद्यापही लोकांच्या मनात ठसलेलाच

कार कोणत्या कंपनीची हे दर्शवणारा आकर्षक लोगो अद्यापही लोकांच्या मनात ठसलेलाच

googlenewsNext
ठळक मुद्देनामवंत व महागड्या मोटारी तयार करणाऱ्या कंपनींचे लोगो तर इतके प्रसिद्ध असतात, की त्यासाठी एम्ब्लेम तयार केला जातो.या लोगोमुळे कारचा मुखवटाही पार बदलून गेलेला वाटतो, हेच या एम्ब्लेम वा लोगोचे महात्म्य आहे.

कारचे सौंदर्य अनेकदा तिच्या मुखदर्शनावरूनही प्रकट होते. ती कार मजबूत आहे की,नजाकतीचे नाजूक सौंदर्य असणारी आहे, अशा विविध घटकांचे ग्राहकाला आकर्षण असते.पण खरे म्हणजे नव्या पिढीतील अनेकांचे आकर्षण असते आपण कोणत्या कंपनीची कार घेतो. नामवंत कंपन्यांच्या कारचे आपण मालक आहोत, ही भावना त्याला सुखावणारी असते. हे लक्षात घेता कंपन्यांच्या लोगोंचाही एक खास वापर होऊ लागला. त्या लोगोना वा एम्ब्लेमला जे काही महत्त्व आहे, ती खरोखरच एक आगळीवेगळी बाब आहे. कारच्या कंपनीचा हा लोगो मनात ठसतो, कोणाला आवडतो तर कोणाला आवडतही नाही.

नामवंत व महागड्या मोटारी तयार करणाऱ्या कंपनींचे लोगो तर इतके प्रसिद्ध असतात, की त्यासाठी खास प्रयत्नपूर्वक तो एम्ब्लेम तयार केला जातो. त्यावर खास मेहनत घेतली जाते. त्यानंतर तो लोगो लोकांच्या मनात रुजल्यानंतर त्या लोगोसाठी इतके वेड तयार होते की, अगदी अन्य कंपन्यांच्या गाड्या, ट्रक, रिक्षावरही या कंपन्यांचे हे लोगो लावण्याचे प्रकार दिसून येतात.

जागतिक दर्जाच्या जुन्या कंपन्यांचे लोगो हे तर अनेकांचे आकर्षण असते. काही कंपन्यांचे हे लोगो अशा पद्धतीने बसवलेले असतात, की ती गाडी अमूक कंपनीची आहे, असे झटकन समजून येते, इतके ते लोकांच्या मनात ठसलेले आहेत. विशेष करून मर्सिडिझ, ऑडी, फोर्ड,स्कोडा, शेवरले आदी जागतिक स्तरावरील जुन्या नामवंत कंपन्यांचे हे लोगो कारवर पाहाताच, ती कार या कंपनीची आहे, इतके ओळखले जाते, एकूण त्यामुळे कंपन्यांचे वेगळे महत्त्वच प्रतीत करून देणारे असतात. काही कंपन्यांचे हे लोगो तर इतके महाग आहेत की,गाड्यांवर लावलेले हे लोगो, एम्ब्लेम चोरीला जाण्याचेही प्रकार होत असतात. अशा एम्ब्लेम्सना तयार करण्यासाठी एकेकाळी भारतातील विविध कंपन्या धातूचा, वापर करीत,ते वजनालाही तचांगले असत मात्र कॉस्ट कडिंगच्या नावाखाली ते चक्क प्लॅस्टिकचेच नव्हेत तर अगदी स्टिकर्समध्ये बसवले जाऊ लागले.

अजूनही काही कंपन्यांचे लोगो धातूने तयार केलेले चांगल्या दर्जाचे असतात. ते चोरीला जाण्याचे प्रकार लक्षातही घेतले गेले तर एका कंपनीने तो लोगो जो कारच्या पुढील बाजूला असतो, तो बॉनेटमध्ये आपोआप जाण्याचीही एक क्लुप्ती लढवली आहे. या लोगोची प्रत्यक्ष कंपनीमधील किंमतही मोठी असते. बाजारात कंपनीच्या नावाने असणारे अनेक प्लॅस्टिकचे लोगो मिळत असतात. हे लोगो दुहेरी स्टीक टेपद्वारे कारच्या पत्र्यावर चिकटवले जातात. पूर्वी ते आतील बाजूने रिबिटवर बसवले जात किंवा अगदी त्याच्यासाठी योग्य खाच वा छिद्र तयार करून स्क्रू-नटबोल्टद्वारेही बसवले जात होते. पण काय आहे आता कालाय तस्मैः नमः असे म्हणावे लागते. अर्थात तरीही लोगोचे आकर्षण अद्यापही लोकांमध्ये ठसलेले आहे, किंबहुना वाहनांचे आकर्षण जसे असते, तसे वाहन निर्मात्या कंपनीबाबतही ते असते हे नाकारता येणार नाही. अनेकदा या लोगोमुळे कारचा मुखवटाही पार बदलून गेलेला वाटतो, हेच या एम्ब्लेम वा लोगोचे महात्म्य आहे.

Web Title: The charming logo that shows this company's car is still unmistakable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.