Nissan Magnite पेक्षाही स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही येतेय; बडी कंपनी जय्यत तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 04:06 PM2020-12-25T16:06:14+5:302020-12-25T16:07:16+5:30

Renault Kiger: Nissan Magnite ला टक्कर देणारी एका बड्या कंपनीची कॉम्पॅक्ट एसयुव्ही येत आहे. ही एसयुव्ही भारतातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. तसेच फिचर्सही कमालीचे असणार आहेत. 

Cheaper compact SUV than Nissan Magnite; Renault Kiger will launch in some months | Nissan Magnite पेक्षाही स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही येतेय; बडी कंपनी जय्यत तयारीत

Nissan Magnite पेक्षाही स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही येतेय; बडी कंपनी जय्यत तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात निस्सानने हॅचबॅकच्या किंमतीत कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच करून एकच खळबळ उडवून दिली होती. याचबरोबर आता बाजारात स्पर्धेलाही तोंड फोडले आहे. यामुळे Nissan Magnite ला टक्कर देणारी एका बड्या कंपनीची कॉम्पॅक्ट एसयुव्ही येत आहे. ही एसयुव्ही भारतातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. तसेच फिचर्सही कमालीचे असणार आहेत. 


ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही मारुतीची, ह्युंदाईची नाही तर निस्सानची जुळी कंपनी रेनोची असणार आहे. Renault Triber ही सात सीटर कार सर्वात स्वस्त कार म्हटले जात होते. मात्र, Nissan Magnite ने हा किताब काढून घेतला आहे. Nissan Magnite ची किंतही आता 1 जानेवारीपासून वाढण्याची शक्यता आहे. ही किंमत 5.5 लाख रुपये असेल. 


Renault Kiger ही ती कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. कारण या कारचीही किंमत 5.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार या सेगमेंटमधील सर्वात छोटी असली तरीही मायक्रो किंवा मिनी एसयुव्ही म्हटले जाणार नाही. कारण या कारची साईज ४ मीटरपेक्षा छोटी असणार नाही.


Renault Kiger चे इंजिन हे निसान मॅग्नाईटसारखेच असणार आहे. जे 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.0 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 72bhp ताकद आणि 96Nm टॉर्क तयार करते. तर टर्बोचार्ज इंजिन 99bhp ताकद आणि 160Nm टॉर्क तयार करेल. ही कार ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी अॅटोमॅटीक ट्रान्समिशनमध्ये येऊ शकते. 


रस्त्यावर येणाऱ्या Renault Kiger चे डिझाईन त्याच्या कॉन्सेप्ट कारसारखेच मिळतेजुळते आहे. रेनो ट्राइबरसारखेच ही कार CMFA+ platform वर असणार आहे. ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी हेडलँप, स्लिट हेडलँप, मल्टी फंक्शनल स्टीअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आदी फिचर्स असणार आहेत.

Web Title: Cheaper compact SUV than Nissan Magnite; Renault Kiger will launch in some months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.