Cheapest Bikes : १ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:50 PM2022-01-31T21:50:46+5:302022-01-31T21:51:01+5:30

पाहा कोणत्या आहेत या बाईक्स आणि कोणती मिळतायत फीचर्स.

Cheapest Bikes Great bikes priced up to Rs 1 lakh Feel the sporty bike with the stylist look know more details and features | Cheapest Bikes : १ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील

Cheapest Bikes : १ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील

Next

भारतीय बाजारपेठेत कम्युटर बाइक्सची सर्वाधिक विक्री होते. या बाईक्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्या किमतीत किफायतशीर आहे, तसेच मायलेजही उत्तम आहे. मात्र, वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या बजेटच्या किमतीतही चांगल्या परफॉर्मन्सच्या बाइक्स देत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्‍या अशा 5 बाईक सांगत आहोत, ज्या स्टायलिस्ट लूकसह स्पोर्टी फिलही देतात.

1. Bajaj Pulsar 150
या बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 149.5 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14bhp पॉवर आणि 13Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक neon, single disc आणि dual disc या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यात हॅलोजन हेडलाइट युनिट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॅकलिट स्विच सारखे फीचर्स देण्यात आलेत.

2. Honda Unicorn
Honda Unicorn या बाईकची किंमत 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. यात 162.7 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तुमच्या सोयीसाठी, युनिकॉर्नमध्ये ट्यूबलेस टायर, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टॉप स्विच, ABS सह फ्रंट डिस्क ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आलेत.

3. Bajaj Pulsar NS125
बजाज पल्सर NS 125 ची किंमत 99,347 (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. बाईकमध्ये 124.45 cc इंजिन देण्यात आले आहे, हे इंजिन 12bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. यात नायट्रोक्स मोनो-शॉकसह टेलिस्कोपिक फोर्क्स उपलब्ध आहेत. बजाज पल्सर NS125 ला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो, जे अॅनालॉग टॅकोमीटर आणि स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, क्लॉक यासारखी माहिती डिस्प्ले करते.

4. Honda SP 125
या बाईकची किंमत 80,086 रुपये ते 84,087 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. यामध्ये स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, ईसीओ इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्युअल इकोनॉमी यासारखी माहिती डिस्प्ले होते. बाईकमध्ये 124 cc इंजिन देण्यात आले आहे, जे 11bhp आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. स्टँडर्ड रुपात या बाइकमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात येतात, परंतु ग्राहक फ्रंट डिस्क ब्रेकचाही ऑप्शन आपल्याला मिळतो.

5. Hero Glamour
या बाईकची सुरुवातीची किंमत 89,256 (एक्स-शोरूम) आहे. यात 124.7 cc इंजिन देण्यात आले आहे. ते 10.72bhp पॉवर आणि 10.6Nm चा टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात एलईडी हेडलाइट, ब्लूटूथ-अनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फंक्शन आणि यूएसबी चार्जर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Cheapest Bikes Great bikes priced up to Rs 1 lakh Feel the sporty bike with the stylist look know more details and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.