Cheapest Car In India : जगातील सर्वात स्वस्त कार, इलेक्ट्रीक नॅनो ईव्ही बाजारात आली हो...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:10 PM2021-10-20T16:10:55+5:302021-10-20T16:12:49+5:30
Cheapest Car In India : चीनची कार निर्माता कंपनी वूलिंग होंगगुआंग एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. अल्टोपेक्षा कमी किंमत आणि लेटेस्ट फिचर्स या कारमध्ये असणार आहेत
मुंबई - सर्वसामान्यांना परवडेल आणि त्यांचं कुटुंब एकत्र प्रवास करू शकेल, अशी कार भारतात लाँच करण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी पाहिलं होतं. आपलं ते स्वप्न भारतीयांचं स्वप्न बनवून त्यांनी ते सत्यातही उतरवलं. देशात टाटांच्या नॅनो कारची चांगलची चर्चा रंगली. आता, जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार नॅनो ईव्ही बाजारात लक्षवेधी ठरत आहे. मारुतीच्या अल्टो कारपेक्षाही या कारची किंमत कमी आहे. दरम्यान, सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने इलेक्ट्रीकल्स वाहनांना लोकांची पसंती मिळत आहे.
चीनची कार निर्माता कंपनी वूलिंग होंगगुआंग एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. अल्टोपेक्षा कमी किंमत आणि लेटेस्ट फिचर्स या कारमध्ये असणार आहेत. या कारने विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत. इलेक्ट्रीक नॅनो ईव्ही कारने एकाच वर्षात विक्रीच रेकॉर्ड तोडले आहेत. नॅनो ईव्ही ही जगातील सर्वात स्वस्त कार असून भारतात कारची किंमत 2.30 लाख रुपये असू शकते. एकदा फूल चार्जिंग केल्यानंतर ही कार 305 किमीपर्यंत धावू शकते. होंगगुआंग कंपनीची मिनी इलेक्ट्रिक कार लोकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. गतवर्षी 2020 मध्ये कंपनीने कारचे 119255 युनिट विकले आहेत. गतवर्षी सर्वाधिक विकला जाणाऱ्या कारचा हा दुसऱ्या क्रमांकाचा युनिट होता.
कारची किंमत 2.30 लाख
जगातील सर्वात कमी किंमतीची कार म्हणून नॅनो ईव्ही इलेक्ट्रीक कारचा दावा करण्यात येत आहे. भारतात या कारची किंमत 2.30 लाख रुपये एवढी असेल. त्यामुळे, मारुती अल्टो, मारुती सुझूकी यांपेक्षा ही कार अधिक स्वस्त असणार आहे. त्यामुळेच, चायनीज कंपनीच्या या कारला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे.
कारची वैशिष्टे
चीनच्या कार निर्मित्ती कंपनी वूलिंग होंगगुआंगने या कारला 2021 टेनजीन इंटरनेशनल ऑटो शो में लाँच केले होते. ही कार टू सीटर आहे. कारचा टर्निंग रेडियस जवळपास 4 मीटर आहे. तर लांबी 2497 मिमी, चौकोनी 1526 मिमी आणि उंची 1616 मिमी एवढी आहे. म्हणजेच, ही कार आकाराने टाटा नॅनो कारपेक्षाही छोटी आहे. इसमें 1600 का व्हीलबेस मिळणार आहे. कारचा हायस्पीड 100 किमी प्रति तास असेल, तर आयपी 67-प्रमाणित 28 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे संचालित आहे.