जबरदस्त! देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स; ४.६६ लाखांपासून सुरू, मिळतंय ३२ किमीचं मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 05:43 PM2021-08-30T17:43:43+5:302021-08-30T17:44:09+5:30
Cheapest CNG Cars In India : सध्या ग्राहक कार खरेदी करताना त्या कारचा एव्हरेज किती असेल याचा सर्वप्रथम विचार करतात.
आजच्या काळात, नवीन कार खरेदी करताना, सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांच्या मनात येतो, तो म्हणजे गाडीचे मायलेज किती आहे. सध्या, पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे जवळजवळ प्रत्येकाला पेट्रोलचा इतर पर्याय शोधण्यास भाग पडत आहे. या प्रकरणात, सीएनजी कार (CNG Cars) सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमतही कमी आहे आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार मायलेजच्या बाबतीतही सर्वोत्तम आहेत. देशात सीएनजी कार्सची विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या असल्या तरी, मारुती सुझुकीकडे या विभागात सर्वोत्तम आणि मजबूत वाहन पोर्टफोलिओ आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 3 स्वस्त सीएनजी कार बद्दल सांगणार आहोत.
Maruti Wagon R CNG:
मारुती सुझुकीची टॉल बॉय हॅचबॅक कार वॅगनआर देखील सीएनजी किटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या सीएनजी प्रकारात कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 58hp पॉवर आणि 78Nm टॉर्क जनरेट करते. यात 60 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. या कारची सुरूवातीची किंमत 5.70 लाख रूपये इतकी आहे. तसेच याचे मायलेजही 32.52 km/kg इतके आहे.
Maruti S-Presso:
मारुती सुझुकीची मिनी एसयूव्ही म्हणून ओळखली जाणारी ही कार कंपनी फिट सीएनजी किटसह देखील येते. त्याच्या CNG प्रकारात कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 67hp ची पॉवर आणि 90Nm ची टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात 55 लिटर क्षमतेचे इंधन टाकी आहे. या कारची सुरूवातीची किंमत 5.06 लाख रुपये इतकी असून ती 31.2 km/kg इतके मायलेज देते.
Maruti Alto CNG:
मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त हॅचबॅक कार अल्टोमध्ये कंपनीने 800cc क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 40hp पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचे सीएनजी व्हेरिएंट 31.59 किमी/किलो पर्यंत मायलेज देते. याची इंधन क्षमता 60 लिटर आहे आणि ते दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 4.66 लाख रुपये इतकी असून ती 31.59 km/kg चं मायलेज देते.