गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:54 PM2022-03-21T15:54:04+5:302022-03-21T15:54:37+5:30

पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले असून, आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत.

cheapest electric car in the world storm r3 booking begins | गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

googlenewsNext

नवी दिल्ली-

पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू लागले असून, आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार हा एक असा पर्याय आहे जिथं ग्राहकांना या त्रासातून कायमची मुक्तता मिळेल. त्यामुळे जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक अशी EV कार बाजारात दाखल झाली आहे की जी तुमच्या बजेटमध्ये तर बसेलच पण तुमच्या पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चातूनही तुमची कायमची बचत होईल. ही इलेक्ट्रिक कार दोन लोकांच्या आसन व्यवस्थेसह आली असून तिला दोन दरवाजे आहेत.

किंमत फक्त 4.5 लाख रुपये
मुंबईतील एका इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपने दावा केला आहे की त्यांनी जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. Storm Motors नावाच्या या स्टार्टअपने Storm R3 कार लाँच केली आहे, ज्याची किंमत फक्त 4.5 लाख रुपये आहे. मुंबईस्थित स्टॉर्म मोटर्सनेही या इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग सुरू केलं आहे आणि ग्राहक फक्त 10,000 रुपयांच्या टोकन रकमेसह Storm R3 बुक करू शकतात. कंपनीनं ही कार तीन प्रकारात उपलब्ध करून दिली आहे. EV ला एक मोठे सनरूफ देखील मिळते आणि एका चार्जवर 50 किमी पर्यंत चालवता येते.

तीनचाकी वाहनात गणना होत नाही
पहिल्या टप्प्यात ही इलेक्ट्रिक कार फक्त दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नवी दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा येथील ग्राहक सध्या ही ईव्ही खरेदी करू शकतात. ही इलेक्ट्रिक कार दिसायला खूपच वेगळी आणि आकर्षक आहे. ही ईव्ही तीन चाकांसह येते पण ती तीनचाकी वाहनांमध्ये गणली जात नाही कारण तीनचाकीच्या पुढील भागाला 1 चाक असतं, तर या कारच्या मागील भागाला एक चाक देण्यात आलं आहे.

Web Title: cheapest electric car in the world storm r3 booking begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.