Mahindra Thar Launch: चिमटा काढून बघा! महिंद्रा थार फक्त 9.99 Lakh रुपयांत लाँच; विश्वासही बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:24 PM2023-01-09T16:24:16+5:302023-01-09T16:24:34+5:30

विश्वास बसेल का? नाही ना.... पण खरे आहे. महिंद्राने फक्त १० लाख रुपयांत महिंद्रा थार लाँच केली आहे. 

Cheapest Mahindra Thar 2WD launched in India at Rs 9.99 lakh: Check price, variants, specs, features | Mahindra Thar Launch: चिमटा काढून बघा! महिंद्रा थार फक्त 9.99 Lakh रुपयांत लाँच; विश्वासही बसणार नाही

Mahindra Thar Launch: चिमटा काढून बघा! महिंद्रा थार फक्त 9.99 Lakh रुपयांत लाँच; विश्वासही बसणार नाही

googlenewsNext

महिंद्रा थारची किंमती कितीय? 15-20 लाखांवर असेल नाही का? हो.... पण आम्ही तुम्हाला थारची किंमत 9.99 लाख रुपये आहे, असे सांगितले तर विश्वास बसेल का? नाही ना.... पण खरे आहे. महिंद्राने फक्त १० लाख रुपयांत महिंद्रा थार लाँच केली आहे. 

महिंद्र थारचे स्वस्त मॉडेल आज लाँच झाले. ही एक्स शोरुम किंमत आहे. तर 2023 Mahindra Thar 4×2 RWD ची टॉप व्हेरिअंटची किंमत 13.49 Lakh रुपयांवर जाते. महिंद्रा थारच्या या प्रकाराची किंमत पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. 4×4 RWD ची सुरुवातीची किंमत 13.59 लाख (एक्स-शोरूम) होती. लाखो लोक जे थारच्या जास्त किंमतीमुळे ती विकत घेऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी महिंद्राने दुसरा पर्याय आणला आहे. 

पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी ही किंमत आहे. यानंतरच्या ग्राहकांना काही हजारांत किंमत वाढू शकते. महिंद्राने 4WD च्या तुलनेत Thar 2WD वर लहान 1.5-लीटर डिझेल इंजिन देखील सादर केले आहे. थार 2WD 1.5 डिझेल फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. 

थार 2WD मधील दुसरे इंजिन 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आहे जे थार 4WD ला देखील वापरले गेले आहे. हे इंजिन केवळ 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय मिळत नाही.

किंमती खालील प्रमाणे...
AX (O) RWD – Diesel MT – Hard Top INR 9.99 Lakh--- INR 9.99 Lakh (एक्स-शोरूम)
LX RWD – Diesel MT – Hard Top-   INR 10.99 Lakh (एक्स-शोरूम)
LX RWD – Petrol AT – Hard Top- INR 13.49 Lakh (एक्स-शोरूम)

Web Title: Cheapest Mahindra Thar 2WD launched in India at Rs 9.99 lakh: Check price, variants, specs, features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.