मस्तच! Sunroof असणाऱ्या या आहेत स्वस्त कार, आत बसून अनुभवा मोकळं आकाश अन् किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 08:18 PM2022-10-29T20:18:29+5:302022-10-29T20:19:10+5:30
Cheapest Sunroof Cars in India: कार ही आता ग्राहकांसाठी जणू एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे.
Cheapest Sunroof Cars in India: कार ही आता ग्राहकांसाठी जणू एक स्टेटस सिम्बॉल बनले आहे. प्रत्येकाला त्यांच्या कारमध्ये अशी वैशिष्ट्ये हवी आहेत, ज्यामुळे त्यांना रॉयल अनुभव घेता येईल. यातील एक फिचर म्हणजे सनरूफ. देशात सनरूफ असलेल्या कारचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. सनरूफच्या माध्यमातून तुम्हाला कारमध्ये बसून मोकळ्या आकाशाचा आनंद तर घेता येतोच, पण त्यामुळे कारलाही छान लूक येतो. अशा ३ स्वस्त कार बद्दल जाणून घेऊयात ज्या सनरूफ फीचरसह बाजारात उपलब्ध आहेत.
1. Tata Nexon
या यादीत टाटा नेक्सॉन पहिल्या क्रमांकावर आहे. या कारच्या XM(S) प्रकारात सनरूफ फिचर देण्यात आले आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत सध्या ९.२० लाख रुपये आहे. कारमध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यात १.२ लीटर तीन सिलेंडर टर्बो-पेट्रोल (120PS आणि 170Nm टॉर्क) आणि १.५ लीटर चार-सिलेंडर टर्बोडीझेल युनिट (110PS आणि 260Nm) यांचा समावेश आहे.
2. Hyundai i20
Hyundai i20 ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. ती मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ सारख्या कारशी स्पर्धा करते. Hyundai i20 च्या Asta O व्हेरिअंटमध्ये तुम्हाला सनरूफ उपलब्ध आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत सध्या ९.५९ लाख रुपये आहे. कारच्या नवीन अवतारात सनरूफ फीचर मिळण्यास सुरुवात झाली आहे. याआधी ते उपलब्ध नव्हते.
3. Kia Sonet
टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा यांच्याशी स्पर्धा करणारी ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. सनरूफ असलेल्या या कारचे सर्वात स्वस्त व्हेरिअंट HTK Plus (iMT) आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख रुपये इतकी आहे. Hyundai Venue वर आधारित ही कार आहे.