कारमधील आसनांची वैविध्यता व उपयुक्तता पारखून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 07:00 PM2017-08-28T19:00:00+5:302017-08-28T19:00:00+5:30

कारमध्ये आज विविध पद्धतीच्या आसनांची व्यवस्था केलेली अाहे. त्या आसनांची उपयुक्ता, विविधता कार घेताना लक्षात घेणे गरजेचे आहे.

Check the diversity and utility of the seats in the car | कारमधील आसनांची वैविध्यता व उपयुक्तता पारखून घ्या

कारमधील आसनांची वैविध्यता व उपयुक्तता पारखून घ्या

Next
ठळक मुद्देचालकाचे आसन पुढे मागे, वर खाली करता येते, त्याला हेडरेस्ट देण्यात येते.मागील सीट्स संपूर्ण सोलो असता, किंवा ६०/४०, ५०/५० या पद्धतीत विभागलेल्या असतात.सेदानमध्ये प्रवासी, चालक यांना दोन हात ठेवण्यासाठी खास हॅण्डग्रीप दिलेलीही असते.

कार घेताना विविध बाबींची आपण माहिती घेत असतो. त्यामधील कम्फर्ट या सदराखाली अनेकदा कारमधील मागील आसनव्यवस्थेमध्ये असणारी वैशिष्ट्ये सांगितली जातात. मागील सीटवर बसणाऱ्या उंच व्यक्तीसाठी लेग स्पेस हा एक मोठा मुद्दा नेहमी आपल्यासमोर मांडला जातो. लेग स्पेस नीट आहे की नाही, ते पाहून घ्या, असा मित्रमंडळींचा सल्ला असतो. काही काळापूर्वी कारमधील आसनांमध्ये चांगल्या पद्धतीचे बदल होण्यास सुरुवात झाली. हे बदल केवळ बसण्यापुरते मर्यादित नव्हते, तर कारमधील सर्व आसनांच्या व्यवस्थेत ते बदल झाले. सोलो सीट जाऊन पुढील बाजूला स्वतंत्र सीट्स देण्यात आल्या. चालकाच्या सीट्सला तर अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या, ज्या पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये नव्हत्या. त्यावेळी पद्धत वेगळी असे. अॅम्बेसेडरच्या सीट्स मऊ वाटत त्यांना एक उंचपणा व अधिक आरामदायीपणा होता. मात्र आज त्या पद्धतीच्या नव्हेत तर अन्य प्रकारच्या साधनांनी तयार केलेल्या सीट्स वापरल्या जाऊ लागल्या आहेत. आजच्या कारमधील सीट्सचे वैविध्यपूर्ण स्वरूप वेगवेगळ्या कारमध्ये,एसयूव्हीमध्ये पाहावयास मिळते. साध्या फ्लॅट सीट, बकेट सीट असे प्रकारही आता आले.
चालकाचे आसन पुढे मागे, वर खाली करता येते, त्याला हेडरेस्ट देण्यात येते. बाजूच्या आसनाला मागेढे सरकावण्याची सोय आहे. यामुळे चालकाशेजारील व्यक्तीला त्याचे पाय लांब करून बसता येते. सीट्च्या पाठीचा भाग मागे पाडता येतो. पुढे कमी अधिक करता येतो.काही काळापूर्वी एका हॅचबॅक कारला सर्व सीट्स अशा प्रकारे जुळवून घेता येत होया की त्यात दोनजण चांगल्या पद्धतीने झोपू शकत. एअरलाइन कम्फर्ट असे नाव त्या आसनांच्या बाबतीत दिले गेले. आज इनोव्हामध्ये वा काही एसयूव्हीमध्ये तशी सोय आहे. त्यात मागील व पुढील आसनांच्या पाठीचा भाग मागच्या दिशेने पाडता येतो व पुढील सीट पुढे घेून मागील सीटची बैठक त्यामध्ये बरोबर अशा रितीने बसते की, तुम्हाला बेडसारखे स्वरूप त्या आसनांना देता येते. सर्वसाधारण आज मागील पाठीचा भाग पुढील आसनांसाठी बराच मागच्या बाजूला पाडता येतो व आरामखुर्चीसारखे त्यावर बसता येते. मागील सीट्स संपूर्ण सोलो असता, किंवा ६०/४०, ५०/५० या पद्धतीत विभागलेल्या असतात. त्यामुळे त्या आसनांचा आवश्यक तसा वापर करून हॅचबॅक कारमध्ये सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध करता येते. काही कारमध्ये मागील सीट पूर्ण फोल्ड करून (मुडपून) पुढील बाजूला ठेवता येते व त्यामुळे मोठाच्या मोठा भाग सामानासाठी मिळतो. हॅचबॅकप्रमाणे एसयूव्हीलाही अशी उपयुक्तता आहे.

सेदानमध्ये प्रवासी, चालक यांना दोन हात ठेवण्यासाठी खास हॅण्डग्रीप दिलेलीही असते. ती फोल्ड करूनही ठेवता येते. त्यात ग्लास वा वस्तू ठेवण्याचीही सोय असते. अति उच्च श्रेणीच्या कारमध्ये पाठीला त्रास होऊ नये म्हणून लुम्बार सपोर्ट दिलेला असतो. याशिवाय मसाज, हॉटबॅगसारखी सोयही असते. आसनांची ही उपयुक्तता खरेच वाढलेली असली तरी त्याचा उपयोग किती प्रमाणात आपण करतो ते महत्त्वाचे आहे. तसेच कार घेतानाही आपण या गोष्टींचा चिकित्सकपणे अभ्यास केला तर आणखी चांगल्या आसनांच्या व्यवस्थेसाठी आपल्याला अन्य कारही पाहाता येतात.कारच्या आसनांना अतिरिक्त सुविधाही जोडता येत असतात. त्या बाजारात उपलब्ध असतात, मात्र त्याचा वापर कसा व किती होऊ शकतो, तो ज्याचा त्याने ठरवायचा असतो.एक मात्र महत्त्वाचे की कारच्या या आसन व्यवस्थेत झालेले हे बदल खरोखरच आकर्षक व उपयुक्त आहेत. कार घेताना त्यासाठी तुम्ही त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन कारही निवडू शकता.

Web Title: Check the diversity and utility of the seats in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.