चायनीज कारने कॉपी केले Maruti Jimny ची स्टाईल, भारतात कधी लॉन्च होणार..?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:15 PM2023-04-13T14:15:14+5:302023-04-13T14:16:31+5:30
या SUV ला पाहून अनेकजण Maruti Jimny ला कॉपी केलं का? असा प्रश्न विचारत आहेत.
Maruti Jimny चे नाव तुम्ही ऐकले असेल, परंतु आज आम्ही या SUV बद्दल नाही, दुसऱ्या एका गाडीबद्दल सांगणार आहोत. ही दिसायला अगदी जिमनीसारखीच आहे. ही कार चीनमध्ये बनवली जात असून, नुकतेच या कारचे काही फोटो समोर आले आहेत. हा SUV ला पाहून लोक जिमनीची कॉपी केली का, असा प्रश्न विचारत आहेत.
जिमनी सारखी दिसणारी कार अधिकृतपणे शांघाय ऑटो शो 2023 मध्ये सादर केली जाणार आहे. या कारचे नाव बाओजुन येप( Baojun Yep) आहे. MG Comet(भारतात लवकरच लॉन्च होणार आहे) प्रमाणे बाओजुन येपदेखील इलेक्ट्रिक कार असेल. ही SUV भारतात MG Yep नावाने लॉन्च केली जाईल. बाओजुन येपची लांबी 3381 मिमी, रुंदी 1685 मिमी आणि उंची 1721 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2110mm आहे. हा MG Comet EV पेक्षा 100mm लांब असेल. ही एसयूव्ही अगदी जिमनीसारखी दिसते. या कारची स्टायलिंग आणि इंटीरियर चायना मॉडेलप्रमाणे बनवले जाईल.
एमजी येप एसयूव्ही इंजिन
एसयूव्हीचे भारतीय मॉडेल सध्या सिंगल मोटर सेटअपसह येईल. नंतर ते 4WD ड्युअल मोटरसह ऑफर केले जाऊ शकते. यामध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी वापरण्यात येणार आहे. याची मोटर 68bhp पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका पूर्ण चार्जवर 303 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असू शकतो.
कधी लाँच होईल?
MG Yep ही इलेक्ट्रिक SUV 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाऊ शकते. लॉन्च झाल्यानंतर या कारची स्पर्धा Citroen eC3 शी असेल.