परवडणारी, छोटी Citroen C3 येत्या २० जुलैला होणार लाँच; टाटा पंचला टक्कर देणार, किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:20 PM2022-07-06T21:20:57+5:302022-07-06T21:21:47+5:30
Citroen C3 Booking And Price Announcement: कंपनीने या सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्हीसाठी अधिकृत बुकिंग सुरु केली आहे. २१ हजार रुपये देऊन या कारची बुकिंग करता येईल.
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी एक नवा गडी येत आहे. Citroen ही कंपनी छोटी आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये Citroen C3 कार लाँच करणार आहे. २० जुलैला लाँचिंग असून याच दिवशी देशभरात आणखी २० शोरुम उघडण्यात येणार आहेत.
कंपनी २० जुलै रोजी सिट्रॉन सी ३ च्या किंमतींवरून पडदा हटविणार आहे. त्या आधीच या कारच्या संभावित किंमती लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कंपनीने या सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्हीसाठी अधिकृत बुकिंग सुरु केली आहे. २१ हजार रुपये देऊन या कारची बुकिंग करता येईल. या कारच्या लाईव्ह आणि फिल असे दोन ट्रिम लेव्हल असणार आहेत.
सिट्रॉनची ही भारतातील दुसरी कार असणार आहे. पहिली कार सिट्रॉन सी ५ ही सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरची होती. सिट्रॉन आता एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. या नव्या कारचे बहुतांश सुटे भाग हे भारतातच बनविण्यात आले आहेत. यामुळे या कारची किंमत आवाक्यात असेल. लीक झालेल्या माहितीनुसार सिट्रॉन सी 3 ची किंमत ही 1.2P Live व्हेरिअंट ६ ते सव्वा सहा लाखांच्या आसपास असू शकते. तर 1.2P Feel व्हेरिअंटची किंमत 7-7.25 लाख रुपये असू शकते. 1.2P फील व्हाईबची किंमत 7.15 ते 7.40 लाख रुपये असू शकते.
ड्युएल टोन व्हेरिअंटची किंमत 8.25 ते 8.50 लाख रुपये असू शकते. ही कार भारतीय बाजारात ४ सिंगल कलर आणि ६ ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. याशिवाय 56 कस्टमाइजेशन ऑप्शंस आि ७० हून अधिक अॅक्सेसरीज पॅक मिळणार आहेत. एलईडी डीआरल, हेडलँप, टेललँप, डुअल टोन सी-पिलरसह अन्य वैशिष्ट्ये असतील.