6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट! 2 लाखांपर्यंत करू शकता बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:04 PM2023-07-19T12:04:13+5:302023-07-19T12:05:48+5:30
भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक नवीन वाहने येत आहेत. जर तुम्ही या महिन्यात स्वत:साठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. फ्रान्समधील ऑटोमेकर कंपनी सिट्रोएनने (Citroën) काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती.
सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ईव्हीसह तीन कार आहेत. भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती. ही एक उत्तम लक्झरी एसयूव्ही आहे, ज्यामध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. या कारची किंमत 37.17 लाखांपासून सुरू होते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनी या कारवर बंपर डिस्काउंट देत आहे.
दरम्यान, Citroën India आपल्या फ्लॅगशिप क्रॉसओवर C5 Aircross वर 2 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. या कारवरील ऑफर 31 जुलै 2023 पर्यंत वैध आहे. तसेच ही ऑफर 2022 नंतर तयार केलेल्या मॉडेल्सवर आहे. या डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
कोणत्या कारला देऊ शकते टक्कर?
या कारमध्ये फुल लोडेड शाइन व्हेरिएंट मिळत आहे. तर ते सिंगल फुल लोडेड शाइन व्हेरियंटमध्ये येते. कारच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 2.0-लिटर, चार-सिलिंडर डिझेल इंजिनसह येते, जे 174bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करते. हे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार भारतीय मार्केटमधील ह्युंदाई टक्सन, जीप कंपास, स्कोडा कुशाक आणि फॉक्सवॅगन टिगुनला टक्कर देऊ शकते.