कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 09:56 AM2021-07-20T09:56:23+5:302021-07-20T09:58:32+5:30

Electric And Petrol Bike : विद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम. खर्च होणार केवळ १७ पैसे.

College students build hybrid motorcycles Will run on both petrol and electric | कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली हायब्रिड मोटरसायकल; पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दोन्हीवर चालणार

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी राबवला अनोखा उपक्रम.खर्च होणार केवळ १७ पैसे.

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. परंतु अशा परिस्थितीत गुजरातमधील एका कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका टीमनं हायब्रिड मोटरसारकल तयार केली आहे. बॅटरी आणि पेट्रोल या दोन्हीवर ही बाईक चालेल, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यामध्ये पेट्रोल इंजिनसह बॅटरीचाही उत्तमरित्या वापर कररण्यात आला आहे.

व्हीव्हीपी इंजिनिअरींग कॉलेजच्या सातव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमनं ही बाईक तयार केली आहे. या बाईकमध्ये हायब्रिड मोड देण्यात आला आहे. तसंच यामध्ये इंजिन चालवण्यासाठी बॅटरीही देण्यात आली आहे. दरम्यान, ही बाईक पेट्रोलवर चालवायची की बॅटरीवर याचा निर्णय रायडरला घ्यावा लागेल. 

दरम्यान ही बाईक पूर्ण चार्ज केल्यानंतर ४० किलोमीटर पर्यंत जाईल असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. "सातत्यानं वाढणारे इंधनाचे दर ही बाईक तयार करण्याचं मुख्य कारण आहे. इलेक्ट्रीक वाहनांसोबत तुम्हाला अनेक बाबींबाबात लक्ष द्यावं लागतं. त्याची किंमतस चार्जिंग इ. आणि ते वाहन तयार करताना सर्वांवर विचार करण्यात आला आहे," अशी माहिती व्हीव्हीएन कॉलेजचे मेकॅमिकल विभागाते डीन डॉ. मणियर यांनी एएनआयला दिली. 

चार बॅटरी
"या बाईकमध्ये चार निरनिराळ्या बातम्या लावण्यात आल्या आहेत. बॅटरी पूर्ण पणे चार्ज होण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. तसंच पूर्ऑण बॅटरी चार्ज होण्यासाठी १७ पैशांचा खर्च येच अशून त्याद्वारे तुम्ही ४० किमी प्रति तास या वेगानं ४० किलोमीटरचं अंतर गाठू शकता," असंही डीन म्हणाले.

Web Title: College students build hybrid motorcycles Will run on both petrol and electric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.