लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:25 PM2023-06-23T13:25:49+5:302023-06-23T13:29:07+5:30

अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे.

Coming Soon maruti evx electric SUV Will Give 550Km Range in Single Charge to be launch in 2025 Know about the specialty | लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

googlenewsNext

लोक बऱ्याच दिवसांपासून मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसते. कारण, मारुती सुझुकीने आपली पहिल्या इलेक्ट्रिक कार मारुती eVX ची चाचणी सुरू केली आहे. कंपनीने आपल्या या कारची संकल्पना याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये जगासमोर ठेवली होती. अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे.

आता या कॉन्सेप्ट कारचे प्रोटोटाईप मॉडेल टेस्टिंगदरम्यान स्पॉट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  Maruti eVX पोलंडमधील क्राकोव (Krakow) येथे एका चार्जिंग स्टेशनवर दिसून आली आहे. हिचे काही फोटोज स्तानिक वेबसाइट ऑटोगॅलेरियाने इंटरनेटवर अपलोड केले आहेत. मात्र, ही टेस्टिंग व्हेहिकल पूर्णपणे कॅमोफ्लेज कव्हर होती. मात्र असे असले तरी कारचा  लुक आणि डिझाइनसंदर्भात बरीच माहिती मसोर येऊ शकते.

अशी आहे मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार - 
Maruti eVX एसयूव्हीचा लुक साधारणपणे कॉन्सेप्ट मॉडेल प्रमाणेच आहे. हिच्या ब्लँक्ड-ऑफ ग्रिल आणि L-शेपच्या हेडलॅम्प्ससह अपराइट फ्रंट फेस देण्यात आला आहे. यात फ्लेयर्ड व्हील आर्च आणि सी-पिलर माउंटेड रिअर डोर हँडल दिसत आहेत.  तर मागच्या बाजूला स्लिम रॅपअराउंड टेललाइट्स आणि एक इंटीग्रेटेड रूफ स्पॉइलर देण्यात आले आहे.

सिंगल चार्जमध्ये 550 Km ची  रेन्ज -
मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोदरम्यान ही कन्सेप्ट सादर करताना, ही SUV सुझुकी मोटर कार्पोरेशनने डिझाईन केल्याचे म्हटले होते. Maruti eVX इलेक्ट्रिक कॉन्सेप्टमध्ये कंपनी 60kWh एवढ्या क्षमतेचा बॅटरी पॅक वापरत आहे. ज्यामुळे साधारणपणे सिंगल चार्जमध्ये 550 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. या कारची लांबी 4,300mm, रुंदी 1,800mm तर उंची 1,600mm एवढी आहे. ही कार पूर्णपणे नव्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2025 पर्यंत बाजारात उतरवण्याची शक्यत आहे.


 

Web Title: Coming Soon maruti evx electric SUV Will Give 550Km Range in Single Charge to be launch in 2025 Know about the specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.