ऑटो क्षेत्रातील 'या' कंपन्या देऊ शकतात उत्तम रिटर्न्स; पाहा, सध्याचा शेअरचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:50 AM2022-05-30T07:50:31+5:302022-05-30T07:50:39+5:30
गुंतवणूक पुढील पाच ते दहा वर्षांसाठी असावी.
ऑटोमोबाईल क्षेत्र गेले काही वर्षे मंदीच्या फेऱ्यात होते. कोरोना काळात तर फारच अडचणींना सामोरे जावे लागलेल्या या क्षेत्राला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन काही कंपन्यांनी सुरू केले असून, भविष्यात या वाहनांची मागणीदेखील वाढेल. या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात. गुंतवणूक पुढील पाच ते दहा वर्षांसाठी असावी.
अशोक लेलँड - ट्रक आणि बस बनविणारी अग्रेसर कंपनी. लाईट कमर्शियल व्हेईकल आणि संरक्षण विभागास लागणारी वाहनेही उत्पादन केली जातात. कंपनीने एकदा स्टॉक स्प्लिट आणि दोनदा बोनस शेअर्स दिले आहेत.
सध्याचा शेअरचा भाव : ₹१४०/-
बाळकृष्ण इंडस्ट्रीज : ऑफ हायवे क्षेत्रातील वाहन श्रेणीतील वाहनांचे टायर बनविणारी कंपनी. ट्रॅक्टर, पोकलेन मशीन, क्रेन्स इत्यादी वाहनांची मोठी टायर्स ही कंपनी बनविते. कंपनीने पाच वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹२,२३५/-
टाटा मोटर्स : ट्रक आणि कार उत्पादन क्षेत्रात अग्रेसर कंपनी. बॅटरीवर चालणारी मोटरकार सध्या बाजारपेठेत चांगली कामगिरी करीत आहे. कंपनीने दोनदा स्टॉक स्प्लिट आणि चार वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.
सध्याचा शेअरचा भाव : ₹४३०/-
बॉश लिमिटेड : वाहन कंपन्यांना डिझेल सिस्टीम, गॅसोलीन सिस्टीम आणि सुरक्षा तंत्रज्ञान पुरविणारी ही कंपनी आहे. कंपनीने चार वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹१४,१८५/-
आयशर मोटर्स : रॉयल इन्फिल्ड मोटारसायकल, आयशर ट्रक्स, लाईट कमर्शियल व्हेइकल्स, ट्रॅक्टर व बसेस यांचे उत्पादन ही कंपनी करते. कंपनीने एकदा स्टॉक स्प्लिट केलेला आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹२,७४२/-
भारत फोर्ज : वाहन इंजिन तसेच इंजिनिअरिंग उत्पादनांसाठी आवश्यक पार्ट्स बनविण्याचा व्यवसाय ही कंपनी करते. यात प्रामुख्याने गिअर्स, फॅन ब्लेड्स, कॉम्प्रेसर्स, टर्बाइन्स इत्यादींचा समावेश आहे. भागधारकांना चार वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹६७३/-
महिंद्रा अँड महिंद्रा : दुचाकी, कार, लाईट कमर्शियल व्हेइकल इत्यादी क्षेत्रांत कंपनीचा व्यवसाय आहे. बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी आणि कार कंपनीने बाजारात आणल्या आहेत. भागधारकांना आतापर्यंत पाच वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केले आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹९५३/-
मारुती सुझुकी : भारतात कार घराघरांत पोचविण्याचे काम खरे तर मारुतीने केले आहे. उत्तम आफ्टर सेल्स सेवा साखळी निर्माण केली आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल या श्रेणीत मात्र या कंपनीने अद्याप पदार्पण केले नाहीये.
सध्याचा शेअरचा भाव : ₹७,९४२/-
हिरो मोटरकॉर्प : मोटारसायकल श्रेणीत भारतात अव्वल कामगिरी करणारी कंपनी. उत्कृष्ट नेटवर्कद्वारे कंपनीने बाजारपेठेतील हिस्सा चांगला ठेवला आहे. कंपनीने दोन वेळा बोनस आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹२,७४२/-
मदरसन सुमी : वाहनांसाठी सुटे भाग बनविणारी कंपनी. यात आरसे, कॅमेरा, गियर कटिंग टूल्स, वाहन लाईट्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्स, शॉक ॲबसॉर्बर्स इत्यादी उत्पादनात सक्रिय असून अनेक वाहन कंपन्यांना पुरवठा केला जातो. तब्बल नऊ वेळा बोनस शेअर्स आणि दोनदा स्टॉक स्प्लिट करून कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल आणि खूश ठेवले आहे.
सध्याचा शेअरचा भाव : ₹१२३/-