CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी Hero MotoCorp धावणार, 60 मोबाईल अ‍ॅब्युलन्स देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:16 PM2020-04-14T19:16:15+5:302020-04-14T19:24:53+5:30

coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी Hero Group ने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

coronavirus : latest news hero motocorp to donate 60 first responder mobile ambulances rkp | CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी Hero MotoCorp धावणार, 60 मोबाईल अ‍ॅब्युलन्स देणार

CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी Hero MotoCorp धावणार, 60 मोबाईल अ‍ॅब्युलन्स देणार

googlenewsNext

नवी दिल्ली : Hero MotoCorp संपूर्ण भारतात ६० कस्टम-निर्मित दुचाकी अ‍ॅब्युलन्स देणार आहे. या दुचाकी अ‍ॅब्युलन्स पहिल्यांदा रिस्पांडर्सच्या माध्यमातून काम करतील. देशातील संबंधित अधिकाऱ्यांकडे या दुचाकी देण्यात येतील. तसेच, या दुचाकी अ‍ॅब्युलन्स ग्रामीण आणि लांब पल्याच्या भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये घेऊन जाण्यासाठी जास्त उपयोगात येतील.

या दुचाकी अ‍ॅब्युलन्सला 150cc आणि डिस्प्लेसमेंटसोबत हिरो मोटोकॉर्प दुचाकीला लावण्यात आलेल्या एक्सेसरीच्या माध्यमातून कस्टम-निर्मित करण्यात आली आहे. याशिवाय, या दुचाकी अ‍ॅब्युलन्समध्ये प्राथमिक उपचार किट, ऑक्सिजन सिलेंडर, आग विझविण्याचे उपकरण आणि सायरन यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी Hero Group ने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या निधीतील ५० कोटी रुपये सध्या पीएम-केअर फंडमध्ये दिले जाणार आहेत. तर बाकीचे ५० कोटी इतर सुविधांसाठी दिले जाणार आहेत. यामध्ये शहरातील भागांत दुचाकी, मास्क वाटप, सॅनिटायझर, ग्लॉव्स आणि १०० व्हेंटिलेटर्स तयार करण्यासोबत रोजंदारी करण्याऱ्या गरजूंना जेवण देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

Web Title: coronavirus : latest news hero motocorp to donate 60 first responder mobile ambulances rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.