CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कारखाने बंद ठेऊन कोरोनाग्रस्तांना देणार ऑक्सिजन; 'या' कार कंपनीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:40 PM2021-04-30T17:40:32+5:302021-04-30T17:51:10+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात करोनाची स्थिती भयानक आहे. त्यामुळे सरकारने सर्व वाहन निर्माता कंपन्यांना आवाहन केले की, ऑक्सिजनचा वापर करू नका. हे ऑक्सिजन कोरोना रुग्णांना सप्लाय करा. 

CoronaVirus News maruti suzuki india has announced closure of its gurugram manesar plants in haryana for maintenance | CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कारखाने बंद ठेऊन कोरोनाग्रस्तांना देणार ऑक्सिजन; 'या' कार कंपनीने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कारखाने बंद ठेऊन कोरोनाग्रस्तांना देणार ऑक्सिजन; 'या' कार कंपनीने घेतला मोठा निर्णय

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) ने हरियाणामधील आपला गुरूग्राम आणि मानेसर प्लांट बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. कारखाने बंद ठेऊन कंपनी  कोरोना रुग्णांना ऑक्सिजन देणार आहे.  

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १ मे ते ९ मे २०२१ दरम्यान या दोन्ही प्लांटमध्ये वाहनांचे प्रोडक्शन बंद राहणार आहे. तसेच कंपनीने हा निर्णय आपल्या मारुतीच्यी मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या प्लांट सुझुकी मोटर गुजरातसाठी लागू केला आहे. म्हणजेच या ठिकाणी वाहनांचे प्रोडक्शन होणार नाही. या काळात कंपनीकडून वार्षिक मेंटनेन्स केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. देशात करोनाची स्थिती भयानक आहे. त्यामुळे सरकारने सर्व वाहन निर्माता कंपन्यांना आवाहन केले की, ऑक्सिजनचा वापर करू नका. हे ऑक्सिजन कोरोना रुग्णांना सप्लाय करा. 

२५ एप्रिल २०२१ ला भारत सरकारकडून एक सर्क्यूलर (परिपत्र) जारी करण्यात आले आहे. यात डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट २००५ अंतर्गत कोविड १९ रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजनची पर्याप्त तसेच अडथळ्या विना उपलब्ध करण्यासाठी ऑक्सिजनच्या सर्व औद्योगिक उपयोगला प्रतिबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व वाहन निर्माता कंपन्यांनी या आदेशाचे पालन करायला हवे असं म्हटलं आहे. मारुती सुझुकीने मार्च २०२१ मध्ये एकूण १७२,४३३ वाहनांचे प्रोडक्शन केले आहे. तर मार्च २०२० मध्ये मारुतीने एकूण ९२,५४० युनिट्सचे प्रोडक्शन केले होते. म्हणजेच मार्च महिन्याच्या तुलनेत या वर्षी मारुतीने ८६.३३ टक्के जास्त वाहनांचे प्रोडक्शन केले आहे. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे भारत सरकारने मार्च महिन्यात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे वाहनांच्या प्रोडक्शन आणि विक्री ध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता पार्लर सुरू करण्यात आले आहेत. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी शक्कल लढवण्यात आली असून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कोट्टायम जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन पार्लर्स उघडणार आहेत. मानरकद येथील सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोविड केअर सेंटरमध्ये अशा एका ऑक्सिजन पार्लरचं (Oxygen Parlour) उद्घाटन करण्यात आलं आहे. हा केरळमधील पहिलाच उपक्रम आहे. 

भारीच! ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता Oxygen Parlour; 'या' जिल्हात खास सुविधा, रुग्णांना मोठा दिलासा

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. ते रुग्ण रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी (Blood Oxygen Level) तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी एम. अंजना यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शिल्पा देविया यांच्या उपस्थितीत मानरकद येथील ऑक्सिजन पार्लरचं उद्घाटन केलं. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण घरी आहेत, अशी ठिकाणं पाहून त्या भागांमध्ये ऑक्सिजन पार्लर्स उभारण्यात येत असल्याचं एम. अंजना यांनी सांगितलं. ऑक्सिजन पातळीत अचानक बदल झाला, तर उपचारांमध्ये होणारा उशीर टाळण्यास यामुळे मदत होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. घरीच उपचार घेत असलेले रुग्ण प्रोटोकॉल पाळून ऑक्सिजन पार्लरमध्ये येऊन ऑक्सिजन पातळी तपासून गरज असल्यास ऑक्सिजन मिळवू शकतात. पार्लरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator) आहे. जे प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन पुरवू शकतं. 

Web Title: CoronaVirus News maruti suzuki india has announced closure of its gurugram manesar plants in haryana for maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.