मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:35 PM2022-03-21T18:35:07+5:302022-03-21T18:35:39+5:30

छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा जवळच्या प्रवासासाठी एखादी स्कूटर असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्याचे पेट्रोलचे दर पाहता त्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे.

Crayon Envy keyless Electric scooter 160 kM range in single charge | मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

Next

छोट्या-मोठ्या कामांसाठी किंवा जवळच्या प्रवासासाठी एखादी स्कूटर असावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण सध्याचे पेट्रोलचे दर पाहता त्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. ग्राहकांची हिच गरज लक्षात घेऊन Crayon Envy ही लो स्पीड स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ही चावीशिवाय सुरू होणारी स्कूटर आहे. कंपनीनं ही चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. यात पांढरा, काळा, निळा आणि सिल्वर रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ६४ हजार रुपये इतकी असणार आहे. यात अनेक चांगले फीचर्स आणि उत्तम बूट स्पेससह देण्यात आली आहे. तसेच, यात कीलेस स्टार्टअप सिस्टम आहे. हे देशभरातील १०० हून अधिक किरकोळ ठिकाणी खरेदी केले जाऊ शकते. या स्कूटरला मोटर आणि कंट्रोलवर 24 महिन्यांची वॉरंटी मिळेल.

कंपनीनं यामध्ये पुढे-मागे जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या मदतीनं अगदी लहान जागेतही पार्क करता येते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा चार्जिंगचा खर्च पाहिला तर 14 पैसे प्रति किलोमीटर इतका आहे. जो इंधनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. जाणून घेऊया या स्कूटरची वैशिष्ट्ये.

Crayon Envy स्कूटरचे फीचर्स 
टेक फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात जिओ टॅगिंग, सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स आहेत. तसेच, या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाइल चार्जिंग पोर्ट आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, यात मॅन्युअल हेडलाइट्स देण्यात आले आहेत, जे आकर्षक डिझाइनसह कमी प्रकाशात चांगली दृश्यमानता देतात.

Crayon Envy ड्रायव्हिंग मोड्स
स्कूटरमध्ये कम्फर्ट सीट्स देण्यात आल्या आहेत आणि जे जास्त वेळ सायकल चालवतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही एक लो स्पीड स्कूटर आहे आणि 25 किमी प्रतितासच्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचू शकते. या विभागासाठी स्कूटरला चालकाचा परवाना आवश्यक नाही.

Crayon Envy ची बॅटरी
स्कूटरमध्ये 250 वॅट्स BLDC मोटर आहे, जे त्यास हायस्पीडपर्यंत पोहोचण्यास मदत करते. यात ट्यूबलेस टायर, डिस्क ब्रेक आणि 150 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 160 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

Web Title: Crayon Envy keyless Electric scooter 160 kM range in single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.