क्रेटा, नेक्सॉनचे आता काही खरे नाही; देशी इलेक्ट्रीक कार तुमचे १० लाख रुपये वाचवणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:02 PM2023-01-17T15:02:53+5:302023-01-17T15:03:28+5:30
सध्या भारतीय बाजारावर टाटाच्या इलेक्ट्रीक कारचा कब्जा आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत, तर आणखी दोन तीन कार येणार आहेत. परंतू महिंद्राने आता बाजीच पलटविणारी खेळी खेळली आहे.
स्वदेशी कार निर्माता कंपनी महिंद्राने आज कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये ईलेक्ट्रीक कार लाँच केली. याची किंमत ह्युंदाई क्रेटाच्या मिड लेव्हल व्हेरिअंटपेक्षाही कमी आहे. यामुळे आता बाजारात प्राईज वॉर सुरु होणार आहे. महिंद्राच्या या एसयुव्हीचे नाव XUV400 EV आहे. सर्वच बाबतीत ही कार क्रेटाला टक्कर देणार आहे. क्रेटा न घेता तुम्ही ही ईव्ही घेतली तर पुढील ८ वर्षांत तुमचे १० लाख रुपये वाचणार आहेत. कसे? पहा गणित...
सध्या भारतीय बाजारावर टाटाच्या इलेक्ट्रीक कारचा कब्जा आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत, तर आणखी दोन तीन कार येणार आहेत. परंतू महिंद्राने आता बाजीच पलटविणारी खेळी खेळली आहे. कारण टाटा नेक्सॉन मॅक्सपेक्षा कमी किंमत ठेवली आहे. तसेच रेंजही तोडीची दिली आहे. पेट्रोल, डिझेलच्या बाजारात मारुती, ह्युंदाईने कब्जा केलेला आहे,. परंतू इलेक्ट्रीकमध्ये या दोन्ही कंपन्या सध्यातही कुठेच नाहीएत.
महिंद्राची ही कार क्रेटाला टक्कर देणार आहे. XUV400 EV वर तीन वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी, बॅटरीवर आठ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तसेच १ लाख ६० हजार किमीची देखील व़ॉरंटी असणार आहे. या कारची टॉप स्पीड १५० किमी आहे. रेंज 456 किमी आहे. आता क्रेटाची कार जी महिंद्राच्या एसयुव्हीपेक्षा महाग आहे तिच्याशी तोलमोल करुया...
क्रेटा पेट्रोल कार सरासरी १५ किमीचे मायलेज देते असे पकडले तर 1,60,000 किमीच्या अंतरासाठी १०० रुपये पेट्रोल प्रमाणे 10 लाख 66 हजार रुपयांचे इंधन लागेल. तर XUV400 EV ला 89,600 रुपये लागतील. महिंद्राच्या दाव्यानुसार या कारची रनिंग कॉस्ट 0.56 पैसे प्रति किमी आहे.
इथेच संपत नाही तर बॅटरी काही वॉरंटी संपल्या संपल्या खराब होत नाही ती आणखी काही महिने, वर्षे चालते. मग किती वाचले? या पैशांत एक नेक्सॉन कार येईल. कदाचित क्रेटासुद्धा येऊ शकते. सध्या चार्जिंग स्टेशनही वाढत आहेत. हायवे, शहरांत किंवा सोसायट्यांमध्ये चार्जिंग स्टेशन उभी राहतील.